मुंबई 14 एप्रिल**:** चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यात (IPL 2021) मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर 10 धावांनी विजय मिळवला. (MI vs KKR) कोलकाताची टीम केवळ 152 धावांचा पाठलाग करत होती. (Mumbai Indians) परंतु अंतिम दोन षटकात फलंदाजांनी केवळ आठ धावा केल्या त्यामुळं विजयाच्या दारात उभं असतानाही केकेआरला पराजय स्विकारावा लागला. मात्र मुंबईच्या या चमत्कारिक विजयावर केकेआरचा मालक अभिनेता शाहरुख खान नाराज आहे. (Shahrukh Khan) त्यानं आपल्या टीमच्या वतीनं चाहत्यांची माफी मागितली आहे. आपल्या संघानं अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. मी टीमच्या वतीनं सर्व केकेआर चाहत्यांची माफी मागतो. अशा आशयाचं ट्विट करुन शाहरुखनं आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही चाहत्यांनी आपली टीम नक्की जिंकेल असं म्हणत शाहरुखला प्रोत्साहन दिलं आहे. अवश्य पाहा - ‘घराबाहेर पडताना भीती वाटते’; सलमान खानचे वडील कोरोनामुळं गेले नैराश्येत
Disappointing performance. to say the least @KKRiders apologies to all the fans!
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 13, 2021
अवश्य पाहा - मराठी अभिनेत्यामुळं झाली कोट्यधीश; flop Rupali कशी झाली लोकप्रिय? कोलकाताचा डाव कसा फसला? मुंबईच्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी दमदार सुरुवात केली होती. या दोघांनी 72 धावांची सलामी भागीदारी रचली. हे दोघेच कोलकाताच्या विजयाचा पाया रचणार असे वाटत असताना राहुल चहरनं गिलला 33 धावांवर बाद केलं. त्यानंतर चहरनं ईऑन मॉर्गन (7), राहुल त्रिपाठी (5) यांनाही पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. दुसऱ्या बाजुला असलेल्या नितीश राणाने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, त्याला आपली खेळी वाढवता आली नाही. चहरने त्यालाही बाद करत कोलकाताचे संकट वाढवलं. राणा बाद झाल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आपला फास अधिकच आवळला. परिणामी अपेक्षित धावा आणि चेंडू यांचं अंतर अधिक वाढत गेलं. शेवटच्या दोन षटकात बुमराह आणि बोल्टने टिच्चून गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना बोल्टनं रसेल आणि कमिन्स यांना बाद केलं. आणि मुंबईनं यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.