मुंबई 14 एप्रिल: कोरोना (coronavirus)विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. जगभरात पसरलेल्या या विषाणूमुळं आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक नामांकित सेलिब्रिटी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. या संक्रमणाला रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. परंतु यामुळं अनेकांच्या आयुष्यात नैराश्य आलं. (Salman khan father Salim Khan)अगदी सलमान खानचे वडील देखील सध्या डिप्रेशनमध्ये (depression)आहेत.
सलीम खान यांनी बॉस डायलॉग्स या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी कोरोनाकाळात आलेला अनुभव देखील सांगितला. ते म्हणाले, “कोरोनामुळं माझं दैनंदिन आयुष्यच बदललं. अनेक दिवस घरात बंद राहिल्यामुळं माझा स्वभाव काहीसा चिडचिडा झाला आहे. घराबाहेर पडताना मास्क लावून फिरावं लागतं. सर्वत्र निराशेचं वातावरण आहे. नाक्यानाक्यावर पोलीस तैनात असतात. तुम्ही मुक्तपणे फिरु शकत नाही. लोक बेरोजगार झाले आहेत. सर्वत्र निराशेचं वातावरण आहे. अन् याचा प्रभाव पडून मी देखील नैराश्येत गेलोय असं वाटतं.”
अवश्य पाहा - मराठी अभिनेत्यामुळं झाली कोट्यधीश; flop Rupali कशी झाली लोकप्रिय?देशात २४ तासांत आढळले 1 लाख 52 हजार 879 पॉझिटिव्ह रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात 24 तासांत 1 लाख 52 हजार 879 करोनाबाधित आढळून आले आहेत. तर 90 हजार 584 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. 24 तासांत 839 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 275 जणांचा मृत्यू झाला आहे.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.