मुंबई 14 एप्रिल: रुपाली गांगुली (Rupali Ganguly) ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आपल्या जबरस्त अभिनयानं प्रेक्षकांना अवाक् कराणाऱ्या रुपालीला देशभरातील लाखो लोक आज फॉलो करतात. तिचा आज वाढदिवस आहे. 44 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. खरं तर चाळीशीनंतर अभिनेत्रींच्या करिअरला उतरती कळा लागते. त्यांना सहाय्यकाच्या भूमिका साकाराव्या लागतात. परंतु रुपाली आजही मुख्य भूमिका साकारताना दिसते. आज ती यशाच्या शिखरावर आहे. अन् त्याचं श्रेय तिनं एका मराठी अभिनेत्याला दिलं. रुपालीनं 2000 साली सुकन्या या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. परंतु यापैकी एकही मालिका फारशी कमाल करु शकली नाही. त्यामुळं रुपालीवर एक फ्लॉप अभिनेत्री असा स्टँप लावला गेला होता. तिला काम मिळणं बंद झालं होतं. त्याच काळात तिनं संजीवनी या सुपरहिट मालिकेत काम केलं खरं परंतु यामध्ये ती सहाय्यक भूमिकेत होती. पहिला चार वर्षात तिनं पाच मालिकांमध्ये काम केलं परंतु यापैकी एकही मालिका सहा महिने देखील चालली नाही. दरम्यान साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली. अन् या मालिकेनं तिचं आयुष्यच बदललं. अवश्य पाहा - रिया चक्रवर्तीला घ्यायचा होता आदित्य रॉय कपूरचा बदला? म्हणून शूट केला हा Kissing सीन! साराभाई वर्सेस साराभाई ही एक विनोदी मालिका होती. यामध्ये तिनं अभिनेता सुमित राघवनच्या पत्नीचं काम केलं होतं. ही मालिका तुफान गाजली अन् रुपालीच्या करिअरला नवसंजीवनी मिळाली. खरं तर रुपालीनं यापूर्वी कधीही विनोदी मालिकेत काम केलं नव्हतं. पण सुमितनं तिला अभिनय करताना खूप मदत केली. अनेकदा डायलॉग्स पाठ करतानाही तो तिला मदत करायचा. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत रुपालीनं या मदतीसाठी सुमितचे आभार मानले होते. जर त्यावेळी सुमितसारखा मित्र नसता तर कदाचित फ्लॉप अभिनेत्रीचा स्टँप कधीच पुसता आला नसता असं ती म्हणाली होती. त्यानंतर रुपालीनं अदालत, परवरीश, आपकी अंतरा यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. आज ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. एका मालिकेसाठी ती जवळपास दोन कोटी रुपये मानधन घेते. यावरुनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.