मुंबई, 12 ऑगस्ट : बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’. सध्या या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यांच्यासोबतच चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय या कलाकारांचे पॉवर पॅक्ड भूमिका बघायला मिळणार आहेत. तसेच ब्रम्हास्त्र मध्ये दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान हेही दिसणार आहेत अशा चर्चा होत्या. ब्रम्हास्त्र चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तर या चर्चांना अधिकच उधाण आले होते. आता या चित्रपटातील शाहरुख खानच्या भूमिकेचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून शाहरुख खान या चित्रपटाचा भाग असेल की नाही, असा अंदाज बांधला जात होता. पण आता शाहरुख खानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान वानर अस्त्राची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाचा ट्रेलरमध्येच शाहरुखची झलक दिसली होती. त्यामुळे सिनेमातील शाहरुखचा लूक पाहण्यासाठी चाहते आतुर होते. मात्र आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.नुकताच शाहरुखचा सिनेमातील लूक समोर आला आहे. हेही वाचा - Ajay-Atul : रिऍलिटी शो जिंकणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं?; अजय अतुल यांनी दिलं उत्तर! व्हायरल झालेल्या या फोटो आणि व्हिडिओंमध्ये, शाहरुख खान रक्ताने माखलेल्या अवतारात दिसत आहे. तो हवेत उंचावत उडी मारताना दिसत आहे, त्याचबरोबर त्याच्या मागे भगवान हनुमानाची प्रतिकृती दिसू लागते.
SRK in & As Vanar Astra 🔥#ShahRukhKhan #Brahmastra pic.twitter.com/Mqu82LHsOV
— BENGAL- TIGER 🐅 (@Sayem_Sam00) August 11, 2022
ब्रम्हास्त्र मधील हे फोटो पाहून शाहरुख खानचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत. मात्र, व्हायरल क्लिप खरंच ब्रह्मास्त्रची आहे की, फक्त चाहत्यांनी बनवलेले एडीट आहे याची अद्याप कल्पना नाही. पण या व्हिडीओ आणि फोटोला प्रचंड लाईक्स आणि शेअर मिळतायत. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात पहिल्यांदाच नवविवाहित जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकतेच चित्रपटातील दुसरे गाणे ‘देवा देवा’ प्रदर्शित झाले आहे. हा सिनेमा प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण आहे. या सिनेमात प्रेक्षकांना रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील लव्ह केमिस्ट्री तसेच ब्रह्मास्त्रावरील युद्ध पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.