मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ajay-Atul : रिऍलिटी शो जिंकणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं?; अजय अतुल यांनी दिलं उत्तर!

Ajay-Atul : रिऍलिटी शो जिंकणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं?; अजय अतुल यांनी दिलं उत्तर!

Ajay-Atul

Ajay-Atul

अजय अतुलच्या गाण्यांनी रसिकप्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. या जोडीने कोण होणार करोडपतीमध्ये रिऍलिटी शो बाबत व्यक्त केलेल्या मताची चांगलीच चर्चा होतेय.

  मुंबई, 12 ऑगस्ट : मराठमोळे संगीतकार अजय अतुल त्यांच्या दमदार संगीतासाठी ओळखले जातात. ज्या गाण्याला त्यांचं संगीत आणि आवाज लाभतो ते गाणं  सुपरहिट ठरतं.अजय अतुलच्या गाण्यांनी रसिकप्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं  आहे.  मराठी चित्रपटसृष्टीतच काय पण हिंदीमध्येही या जोडीचा दबदबा आहे. संगीतकार अजय-अतुल हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जातात.  हे दोघे  लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात दिसणार आहेत. या शो चा एक प्रोमो नुकताच समोर  आला आहे. त्यामध्ये अतुल गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याची आता चांगलीच  चर्चा होत आहे. 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे. या कार्यक्रम म्हणजे ज्ञान आणि मनोरंजन यांची सांगड घातलेला कार्यक्रम आहे. मराठीमधील कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते  सचिन खेडेकर करत आहेत. या कार्यक्रमामध्ये येत्या शनिवारी प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल हजेरी लावणार आहेत. अजय- अतुल पहिल्यांदाच प्रेक्षकांना कोण होणार करोडपतीमध्ये खेळताना दिसणार आहेत. हेही वाचा - Amruta Khanvilkar : मराठमोळी चंद्रमुखी थिरकली धक धक गर्ल माधुरीसोबत; दाखवणार नृत्याचा अविष्कार येत्या भागाचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये अतुल गोगावलेने रिएलिटी शो बाबत त्याचं  मत व्यक्त केलं आहे. त्याची आता सगळीकडे चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये अतुल गोगावले यांनी गाण्यांच्या रिएलिटी शोचं सत्य सांगितलं आहे. ते म्हणाले कि, 'गाण्याच्या  रिएलिटी शो मधून जे गायक जिंकले आहेत त्यांना आम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये प्लेबॅक सिंगिंगसाठी बोलावतो तेव्हा त्याला ते गाणं  योग्य प्रकारे गाता येत नाही.' याचवेळी पुढे ते म्हणाले कि, 'जेव्हा या गायकांना स्वतःच गाणं गाण्याची वेळ येते तेव्हा त्याला माहीतच नसतं  कि त्या गाण्यावर कशा पद्धतीने  आरूढ व्हायचं.'
  मोठमोठ्या गाण्याच्या रिऍलिटी शो मध्ये जिंकलेल्या गायकांचं  पुढे काय होतं  हा प्रश्न प्रेक्षकांना नेहमीच पडतो. या गायकांचं रिऍलिटी शो दरम्यान प्रचंड कौतुक होतं. त्यांच्या गायकीवर परीक्षकांसहित प्रेक्षक सुद्धा फिदा होतात. पण हा शो संपल्यानंतर मात्र हे गायक कुठेही दिसत नाहीत. त्यांचं पुढे नक्की काय होतं, ते चॅनल प्लेबॅक सिंगर म्हणून यशस्वी का होत नाहीत याचं  स्पष्ट उत्तरच आता अजय अतुल यांनी दिलं आहे. अजय अतुल या जोडीने आजपर्यंत अनेक रिऍलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. नुकतेच या दोघांनी इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाचे परीक्षण केले होते. हा कार्यक्रम या जोडीमुळे हिट ठरला होता. पण आता अजय अतुलने रिऍलिटी शो बद्दल व्यक्त केलेल्या मताला अनेकांनी  पाठींबा दर्शवला आहे.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या