मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

किंग खानच्या लेकीची मित्रांसोबत धम्माल, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

किंग खानच्या लेकीची मित्रांसोबत धम्माल, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सुहाना तिच्या मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सुहाना तिच्या मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सुहाना तिच्या मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 25 फेब्रुवारी : बॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान स्टारडमच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते. अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नसतानाही सुहाना सोशल मीडियावर मात्र सतत चर्चेत असते. नुकतेच सुहानानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सुहाना तिच्या मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. तिनं तिच्या पूर्ण ग्रुपचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुहाना ब्लॅक टँक टॉप आणि पिंक ट्रॅक पॅन्टमध्ये दिसत आहे. सुहाना तिच्या मित्रांसोबत खूपच खूश दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

Bigg Boss च्या घरात खरंच होतं भूत? विशाल आदित्य सिंहनं केला धक्कादायक खुलासा

सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूची तर तिचे चाहते मागच्या बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. पण सुहाना मात्र योग्य वेळेची वाट पाहत आहे असं दिसतं. सध्या सुहाना न्युयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत आहे. कॉलेजमध्ये तिनं थिएटरमध्ये काम केलं आहे. अभिनयाची आवड तर तिला बालपणापासूनच आहे. काही दिवसांपूर्वीच तिची एक शॉर्टफिल्म रिलीज झाली ज्यात तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली.

टीव्हीची ‘संस्कारी बहू’ झाली बोल्ड, शेअर केले बाथटबमधील PHOTOS

सुहाना बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. तिच सोशल मीडिया अकाउंट जरी प्रायव्हेट असलं तरीही तिचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा ती बॉलिवूडच्या कोणत्याही इव्हेंटला हजेरी लावते त्यावेळी सर्व कॅमेरा तिच्यावर रोखले जातात. तिचे फोटो पाहिल्यावर ती ग्लॅमर आणि सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही अभिनेत्री पेक्षाही कमी नाही हे लक्षात येतं.

बिपाशा बासूनं पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये केला रोमान्स, KISS करतानाचे फोटो व्हायरल

First published:

Tags: Bollywood, Shahrukh khan, Suhana khan