मुंबई, 25 फेब्रुवारी : टीव्हीची ‘संस्कारी बहू’ म्हटलं की समोर येतो तो साधाभोळा चेहरा, टिपिकल साडी, डोक्यावर पदर आणि सर्वांशी आदरानं वागणारी सून. टीव्ही सिरिअलमधील या सूना घरा-खरात लाडक्या असतात. पण या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मात्र त्यांच्या रिअल लाइफमध्ये खूप वेगळ्या असतात. टीव्हीची ‘संस्कारी बहू’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री देबीना बॅनर्जी सुद्धा नुकत्याच एका बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. टीव्ही अभिनेत्री देबीना बॅनर्जीनं नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये देबीना फोम आणि गुलाब पाकळ्यांनी भरलेल्या बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. तिनं केसात लाल रंगाचं फुल लावलं आहे. या फोटोंमध्ये देबीना खूपच सुंदर दिसत आहे. तिचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. #MeToo चळवळीनंतर तनुश्री करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक, डान्सचा धमाकेदार VIDEO VIRAL
अशाप्रकारे बोल्ड फोटोशूट करण्याची देबीनाची ही पहिली वेळ नाही या आधीही अनेकदा तिनं असं बोल्ड फोटोशूट केलं आहे. याशिवाय तिचे व्हेकेशन फोटो सुद्धा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सध्या ती गुजरातमध्ये पती गुरमीतसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या व्हेकेशनचेही काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यात तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. क्रिकेटपटूशी लग्न करणार का? या प्रश्नावर पहिल्यांदाच अनुष्कानं दिलं उत्तर
देबीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती ‘विष’ या मालिकेत दिसली होती. आता हा शो बंद झाला आहे. याशिवाय तिनं 2008 मध्ये तिनं रामायण या मालिकेत ‘सीता माँ’ची भूमिका साकारली होती. याच शोमध्ये तिचा पती गुरमीत चौधरीनं श्रीरामांची भूमिका साकारली होती. तसेच कॉमेडी शो चिडियाघरमध्ये देबीनानं साध्या भोळ्या सुनेची भूमिका साकारली होती. ‘तान्हाजी’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, 46 दिवसांनंतर एवढी आहे कमाई

)







