काय सांगता! शाहरूख खान या विकेंडला तुमच्या घरीच करणार डान्स, प्रियांकाही असणार सोबत

काय सांगता! शाहरूख खान या विकेंडला तुमच्या घरीच करणार डान्स, प्रियांकाही असणार सोबत

या विकेंडला तुम्हाला प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान यांचा धम्माल डान्स परफॉर्मन्स घरीच पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघंही चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. या दोघांनी कोरोनाग्रस्तांना मदत करताना कोणतीही कसर सोडलेली नाही. देशातील कोरोनाग्रस्तांना मदत केल्यानंतर आता हे दोघंही जग वाचवण्याच्या मोहिमेत सहभागी होणार आहे. दरम्यान या विकेंडला तुम्हाला प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान यांचा धम्माल डान्स परफॉर्मन्स घरीच पाहायला मिळणार आहे.

अमेरिकन पॉप सिंगर लेडी गागानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक ऑनलाइन कॉन्सर्ट 'वन वर्ल्ड : टुगेदर अ‍ॅट होम'ची घोषणा केली आहे. ज्यात हॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी होत आहेत. तर बॉलिवूडमधून शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे दोघं सहभागी होणार आहेत. ही ऑनलाइन कॉन्सर्ट या विकेंडला होणार असल्यानं चाहत्यांना शाहरुख खानचा डान्स परफॉर्मन्स घरबसल्या पाहायला मिळणार आहे.

सनी लिओनीही बघतेय लॉकडाऊन संपायची स्वप्न, Beach Look मधला हॉट फोटो केला शेअर

लेडी गागाच्या या कॉन्सर्टमधून मिळणारे सर्व पैसे हे कोरोना पीडितांच्या मदतसाठी आणि या व्हायरसशी लढण्यासाठी WHO ला दिला जाणार आहे. या कॉन्सर्टमधून फंड गोळा केला जाईल ज्यातून जगभरातल्या गरजूंना मदत केली जाणार आहे. लेडी गागा, प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान यांच्यासोबत क्रिस मार्टिन, अ‍ॅड्डी वेडर, अ‍ॅल्टन जॉन, जॉन लीजेंड, लीजो, जे बाल्विन, स्टीवी वंडर, बिली जो आर्मस्ट्रांग, अँड्रिया बॉसेली, कीथ अर्बन हे कलाकार परफॉर्मन्स देणार आहेत. तर प्रसिद्ध टॉक शो होस्ट जिमी फॉलन, जिमी किमेल आणि स्टीफन कोलबर्टबिल हे हा शो होस्ट करणार आहेत.

प्रसिद्ध निर्मात्याची दुसरी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, याआधी आला होता हार्टअटॅक

या कॉन्सर्टचं प्रसारण 18 एप्रिलला अमेरिकेतील टीव्ही नेटवर्क ABC, CBC आणि NBC यावर होणार आहे. याशिवाय या कॉन्सर्टचं प्रसारण ऑनलाइन सुद्धा होणार आहे. कोरोना व्हायरसच्या या लढाईमध्ये शाहरुखनं भारत सरकारला आर्थिक मदत तर केलीच आहेत पण यासोबतच शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खाननं त्यांचं खासगी ऑफिससुद्धा BMC च्या मदतीसाठी ओपन केलं आहे. तर प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसनं पीएम केअर्स फंड, यूनिसेफ, फीडिंग अमेरिका यासारख्या अनेक संस्थांना दान केलं आहे.

(संपादन : मेघा जेठे.)

25 हजार कामगारांना मदत केल्यानंतर मालेगावच्या महिलांसाठी सलमान ठरला देवदूत

First published: April 15, 2020, 10:30 AM IST

ताज्या बातम्या