जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मालेगावमधील महिलांसाठी सलमान ठरला देवदूत, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना केलं अन्नधान्य वाटप

मालेगावमधील महिलांसाठी सलमान ठरला देवदूत, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना केलं अन्नधान्य वाटप

मालेगावमधील महिलांसाठी सलमान ठरला देवदूत, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना केलं अन्नधान्य वाटप

काही दिवसांपूर्वी सलमान खान यानं 25 हजार कामगारांना आर्थिक साहाय्य केले होते. आता तो रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांसाठी पुढे सरसावला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 एप्रिल : कोरोनाविरोधातील (Coronavirus pandemic) लढाईत सर्व भारतीय एकवटले आहेत. अनेक मोठे उद्योजक, खेळाडू, बॉलिवूड कलाकार आणि अगदी सामान्य जनता सुद्धा कोरोनाच्या लढाईत आर्थक मदत करत आहे. दरम्यान अभिनेता सलमान खान याने मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान यानं 25 हजार कामगारांना आर्थिक साहाय्य केले होते. आता तो रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांसाठी पुढे सरसावला आहे. हातावरचे पोट असणाऱ्या जवळपास 50 महिलांना सलमान खान याने मदत देऊ केली आहे. (हे वाचा- बादशाहच्या ‘गेंदा फूल’वर या मुलीचा VIDEO VIRAL, जॅकलिनलाही टक्कर देतील अशा अदा ) इंडिया टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मालेगावमधून काही जणांशी संपर्क केला होता. त्यानुसार या 50 महिलांना आर्थिक सहकार्याची गरज असल्याचे सलमानपर्यंत पोहोचवण्यात आले. सलमान खानच्या टीमने या फोनमागील सत्यता पडताळून पाहिली आणि त्यांची समस्या खरी असल्याने त्याची टीम या महिलांपर्यंत पोहोचली. त्यांनी या महिलांना शीधा देऊ केला आहे. सलमान खानचा मॅनेजर जॉर्डी पटेलने या बातमीला दुजोरा दिला आहे. सलमानने कला विश्वामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत तर दिलीच आहे पण आणखी काही ठिकाणीही त्यांनी अन्नधान्याची मदत केल्याचे समोर येत आहे. वांद्रा पूर्व भागातील आमदार जीशान सिद्दीकी यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. सलमानने केलेल्या मदतीचे त्यांनी यामध्ये आभार मानले आहेत.

जाहिरात

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी असाच पुढाकार घेत विविध पद्धतीने या कोरोनाच्या लढाईत मदत केली आहे. करीना कपूर, सैफ अली खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, सारा अली खान, विकी कौशल, अमिताभ बच्चन आणि अशा अनेक कलाकारांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या संकटात असे अनेक हेल्पिंग हँड्स पुढे आले, तर भारत कोरोनाला हरवू शकेल असा विश्वास सर्वच स्तरातून व्यक्त केला जात आहे. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात