मुंबई, 08 जून : एकीकडे प्रभास आणि क्रिती सेनॉनचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा चर्चेत आहे, तर दुसरीकडे नितेश तिवारीचा ‘रामायण’ हा सिनेमाही चर्चेत आहे. दंगलचे दिग्दर्शक नितीश तिवारी लवकरच ‘रामायण’ हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. अनेक दिवसांपासून या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती. आता या चित्रपटाच्या कलाकारांबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास श्रीरामाची भूमिका साकारत आहे तर क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. याच कथेवर आधारित चित्रपट आता नितेश तिवारी दिग्दर्शित करणार आहेत. ‘रामायण’ असं या चित्रपटाचं नाव असून रिपोर्ट्सनुसार, ‘रामायण’चे शूटिंग आता डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दल अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. आता या चित्रपटातील कलाकारांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. आलिया भट्टने नुकतीच नितेश तिवारी यांची भेट घेतली, ज्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. याच व्हिडिओनंतर आलियाला नितेशने सीतेच्या भूमिकेसाठी साइन केल्याची चर्चा सुरू झाली.
‘रामायण’ आणि त्यातील कलाकारांबद्दलच्या बातम्यांनुसार रणबीर कपूर गेल्या काही आठवड्यांपासून डीएनईजी ऑफिसमध्ये चकरा मारताना दिसत आहे. दिसत आहे. ‘रामायण’ कुठपर्यंत पोहोचले आहे हे पाहण्यासाठी रणबीर इथे येत राहतो. ‘रामायण’ चित्रपटाचे जग कसे असावे याचे प्री-व्हिज्युअलायझेशन करण्यात आले आहे. आता टीम भगवान रामच्या भूमिकेसाठी रणबीरची लुक टेस्ट करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर त्याचा परफेक्ट लूक पाहण्यासाठी स्टुडिओला वारंवार भेट देत आहे. आणि मग त्यानुसार रणबीर त्याच्या अंगावर काम करेल.
मंदिरासमोर क्रिती सेनॉनला केलं किस; भाजप नेत्याचा संताप
आलिया भट्टने आरआरआरमध्ये सीतेची भूमिका साकारली होती. तेव्हापासून चाहते सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीला पहिली पसंती होती. आता चाहत्यांची ही इच्छा ‘रामायण’मध्ये पूर्ण होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून रणबीर आणि आलिया ज्या ऑफिसला सतत भेट देत होते, त्या ऑफिसचे नाव ‘रामायण’ ठेवण्यात आले आहे. येथूनच नितेश तिवारी आणि त्यांच्या टीमने ‘रामायण’चे विश्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, सीतेच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित झाले आहे. तर रणबीर भगवान राम ही भूमिका साकारणार आहे. त्याची अधिकृत घोषणा यंदाच्या दिवाळीत होईल. त्याचवेळी रावणाच्या भूमिकेसाठी ‘केजीएफ’ स्टार यशचे नाव पुढे येत आहे. यशने अद्याप हा चित्रपट साईन केलेला नाही. पण यश लवकरच ‘रामायण’ साइन करेल असा विश्वास मधु मंतेना यांना आहे. अल्लू अरविंद, मधु मंटेना आणि नमित मल्होत्रा ’रामायण’ची निर्मिती करत आहेत. तर ‘दंगल’ फेम नितेश तिवारी व्यतिरिक्त रवी उदयवार याचे दिग्दर्शन करणार आहेत. हे पॅन इंडिया 2025 मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.