Home /News /entertainment /

शाहिद-मीराकडून घडली मोठी चूक, BMC ने केली कडक कारवाई

शाहिद-मीराकडून घडली मोठी चूक, BMC ने केली कडक कारवाई

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांनी एवढी मोठी चूक केली आहे की मुंबई महानगरपालिकेनं याबाबत कठोर पावलं उचलली आहेत.

  मुंबई, 18 मार्च : सध्या जगभरात कोरोना व्हायरस ( Coronavirus ) मुळे हाहाकार माजला आहे. अनेक लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातही यासाठी उपाययोजना सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून पब्लिक जिम, मॉल आणि थिएटर्स हे बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. त्यामुळे मनोरंजन सृष्टीला याचा सर्वांत मोठा फटका बसत आहे. पण या दरम्यान अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांनी एवढी मोठी चूक केली आहे की मुंबई महानगरपालिकेनं याबाबत कठोर पावलं उचलली आहेत. कोरोना व्हायरसबाबत खबरदारी म्हणून राज्य सरकारनं सर्वांना घरात राहण्याचा सल्ला दिला. अनेक ठिकाणी मालिका आणि सिनेमांचं शूटिंग थांबवण्यात आलं. तसेच जिम, मॉल सारख्या सार्वजनिक सुविधा सुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत. असं असतानाही शाहिद आणि त्याची पत्नी मीरा एका जीममधून बाहेर पडताना स्पॉट झाले आणि याचा फटका मात्र जीमच्या मालकाला बसला आहे. बीएमसीनं या जिमवर कडक कारवाई करत ही जिम सील केली आहे. जॉनी लीवर मुलीसोबत करत होता Tik Tok Video आणि बाप-लेकीत झालं जोरदार भांडण
  View this post on Instagram

  💕

  A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

  'मुंबई मिरर'न दिलेल्या वृत्तानुसार या जीमच्या VIP एरियामध्ये वर्कआऊट करताना दिसला होता. तर मीरा सुद्धा सतत VIP आणि जनरल एरियामध्ये फिरताना दिसले. एवढंच नाही तर हे दोघंही दुसऱ्या गेटनं बाहेर पडताना कॅमेरात कैद झाले. हृतिकबाबत रंगोलीचा मोठा खुलासा; फोटो शेअर करुन म्हणाली, ‘कधीकाळी मला...’ सूत्रांच्या माहितीनुसार, एच-वेस्ट वॉर्डचे असिस्टंट कमिशनर विनायक विस्पुते यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे ही जिमच्या व्यवस्थापनाची चूक आहे. जर राज्य सरकारनं जीम बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असताना जिम चालू का ठेवण्यात आली. जर त्यांन सरकारच्या आदेशाचं उल्लंघन केलं असेल तर त्यांना या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
  शाहिद या जिममध्ये दिसल्याचं वृत्त समोर आल्यानंतर अँटीग्रॅव्हिटी क्लबच्या मालकानं असा दावा केला आहे की त्या दिवशी जिम पूर्णपणे बंद होती. शाहिद आणि मीरा केवळ मित्राच्या नात्यानं मला भेटायला आले होते. मागच्या काही दिवसांपासून शाहिद त्याचा आगामी सिनेमा जर्सीच्या शूटमध्ये बीझी आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे आता या सिनेमाचं शूटिंग 31 मार्च पर्यंत थांबवण्यात आलं आहे. अश्लील गाण्यात घेतलं महात्मा गांधीजींचं नाव, अभिनेत्री विरोधात FIR दाखल
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Shahid kapoor

  पुढील बातम्या