मुंबई, 18 मार्च : बॉलिवूड अभिनेता जॉनी लीवर त्याचा अभिनय आणि कॉमेडीसाठी ओळखला जातो. पण सध्या त्याच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्यासोबत त्याची मुलगी जॅमी लीवर सुद्धा दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एकीकडे जॉनी लीवर परेश रावल यांचे डायलॉग बोलताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्याची मुलगी त्याचे डायलॉग बोलताना दिसत आहे. त्यांचा हा टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये जॉनी लीवर त्याची मुलगी त्याला अनेकदा समजावून सांगूनही तिने सांगितलेलं नाव विसरत राहतो. ज्यामुळे त्याची मुलगी त्याच्यावर रागावते आणि त्यांचं भांडण होतं. हा व्हिडीओ जॅमीनं तिच्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे. त्यानंतर जॉनीनं सुद्धा तिचा व्हिडीओ रिट्विट करत त्यात परेश रावल यांना सुद्धा टॅग केलं आहे.
अश्लील गाण्यात घेतलं महात्मा गांधीजींचं नाव, अभिनेत्री विरोधात FIR दाखल
1st Tiktok with daddy! On Popular demand.. Lekin kuch hatke 😉 @iamjohnylever @TikTok_IN #chotachatri pic.twitter.com/BO3niU0t6z
— Jamie Lever (@Its_JamieLever) March 17, 2020
हा व्हिडीओ शेअर करताना जॉनी लीवरनं लिहिलं, ‘माझी मुलगी जॅमीनं हे माझ्यासाठी केलं आणि मी हे तुमच्यासाठी केलं बापू’ जॅमीचा तिच्या वडीलांसोबचा हा पहिला टिक टॉक व्हिडीओ आहे ज्याची माहिती तिनं तिच्या ट्विटर हॅन्डलवर दिली होती.
वयाच्या 60 व्या वर्षी ही अभिनेत्री खेळतेय टेनिस, VIDEO पाहून व्हाल थक्क
जॅमी आणि जॉनीच्या या व्हिडीओवर परेश रावल यांनीही कमेंट केली आहे. त्यांनी लिहिलं, धन्यवाद जॉनी. तू नेहमीच माझा आवडता अभिनेता आहेस. मी जेवढ्या लोकांना ओळखतो त्यातील सर्वात चांगली व्यक्ती तू आहेस. तर जॅमी प्रतिभाशाली असण्यासोबतच आनंदची खाण आहे. देव तुम्हाला सुखी ठेवो. जॉनी लीवर आणि परेश रावल यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. या दोघांनी शेवटचं ‘हाउसफुल 4’ काम केलं होतं.
शिल्पा शेट्टीनं लगावली नवऱ्याच्या कानशिलात; म्हणाली, ‘लायकीत राहा...’