जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नवीन संसद भवनाचं उदघाटन होताच या सुपरस्टार्सचं 'ते' ट्विट चर्चेत; पीएम मोदींना संबोधत म्हणाले...

नवीन संसद भवनाचं उदघाटन होताच या सुपरस्टार्सचं 'ते' ट्विट चर्चेत; पीएम मोदींना संबोधत म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन केले. आता यावर भारतातील मोठ्या कलाकारांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 मे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन केले. यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी देशवासियांना नवीन संसदेची झलक दाखवण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शाहरुख खान, अक्षय कुमार आणि रजनीकांत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. देशातील अक्षय-शाहरुख यांनी नव्या संसदेच्या व्हिडिओला व्हॉईस ओव्हर देऊन त्यासंबंधीचे त्यांचे अनुभव शेअर केले आहेत, तर रजनीकांत यांनी तामिळ सत्तेचे प्रतीक असलेल्या राजदंडाच्या वापराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तिन्ही दिग्गज कलाकारांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. पीएम मोदींनी तिन्ही कलाकारांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले असून नवीन संसद हे लोकशाही सामर्थ्य आणि प्रगतीचे प्रतीक असल्याचे वर्णन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना ‘MyParliamentMyPride’ या हॅशटॅगसह नवीन संसद भवनाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्याची विनंती केली होती. त्यांनी शाहरुख खान, अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि सुपरस्टार्सच्या पोस्ट पुन्हा शेअर केल्या आहे. तर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांनी त्यांच्या व्हॉइसओव्हरसह नवीन संसद भवनाचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पीएम मोदींना टॅग करत शाहरुख खानने लिहिले की, ‘जे लोक आपल्या संविधानाचे संरक्षण करतात, या महान देशाच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या विविधतेचे रक्षण करतात त्यांच्यासाठी हे नवीन घर किती छान आहे. नवीन भारतासाठी नवीन संसद भवन. भारताच्या अभिमानाचे जुने स्वप्न. जय हिंद! #MyParliamentMyPride’ शाहरुख खानने शेअर केलेला संसद भवनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. IIFA लाही लागलं मराठी चित्रपटाचं ‘वेड’; रितेश जिनिलियाने जोडीनं स्वीकारला ‘हा’ मानाचा पुरस्कार शाहरुख खानचे ट्विट शेअर करत पीएम मोदींनी लिहिले, ‘सुंदर! नवीन संसद भवन हे लोकशाही शक्ती आणि प्रगतीचे प्रतीक आहे. ते परंपरेला आधुनिकतेशी जोडलेले आहे.’ त्याचवेळी अक्षय कुमारने व्हॉईसओव्हरमध्ये संसद भवन आणि दिल्लीशी संबंधित अनुभव सांगितले. त्याने लिहिले, ‘संसदेची ही भव्य नवी इमारत पाहणे अभिमानास्पद आहे. भारताच्या विकासाचे ते नेहमीच एक प्रतिष्ठित प्रतीक बनू दे.’ असं म्हटलं आहे.

जाहिरात

अक्षय कुमारच्या या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही तुमचे विचार खूप छान पद्धतीने मांडले आहेत. आपली नवीन संसद ही खरोखरच आपल्या लोकशाहीचा दिपस्तंभ आहे. जे देशाचा समृद्ध वारसा आणि भविष्यातील उत्साही आकांक्षेचे प्रतिबिंब दर्शवते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. याशिवाय रजनीकांत यांनीही नव्या संसदेबाबत ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘राजदंड – तामिळ सत्तेचे पारंपारिक प्रतीक – आता भारताच्या नवीन संसद भवनात चमकेल. आदरणीय नरेंद्र मोदी जी यांचे मनःपूर्वक आभार, या गोष्टीचा तमिळ लोकांना अभिमान आहे.’ असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात