'आयफा' हा बॉलीवूडमध्ये मानाचा मानला जाणारा पुरस्कार आहे. नुकताच हा पुरस्कार सोहळा यंदाच्या वर्षी अबू दाबी येथे पार पडला. यात रितेश जिनिलियाने खास हजेरी लावली होती.
‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘वेड’ चित्रपटाला प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला.
यावेळी रितेश आणि जेनिलियाने परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानले. आयफाने आपल्या सोशल मीडिया पेजवरून ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
ही आनंदाची बातमी ऐकून चाहते रितेश आणि जिनिलियाचं चांगलंच कौतुक करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
वेड चित्रपटामधून रितेश आणि जिनिलियाची जोडी हिट झाली. फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर ओटीटीवर देखील या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.
प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव मराठीसह हिंदी भाषेत देखील हा चित्रपट डब करण्यात आला असून प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देताना दिसून येतायत.