जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Jawanच्या निर्मात्यांना रिलीज आधीच मोठा फायदा; इतक्या कोटींना विकले सिनेमाचे म्युझिक राइट्स

Jawanच्या निर्मात्यांना रिलीज आधीच मोठा फायदा; इतक्या कोटींना विकले सिनेमाचे म्युझिक राइट्स

जवान सिनेमाचे म्युझिक राइट्स विकले गेले

जवान सिनेमाचे म्युझिक राइट्स विकले गेले

जवान हा एक अँक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे. शाहरुख सिनेमात जबरदस्त अँक्शन मोडमध्ये दिसणार आहे. रिलीज आधीच सिनेमाला मोठा फायदा झालाय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 जून : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा नवा सिनेमा येऊ घातला आहे. पठाणच्या दमदार यशानंतर शाहरूखचा जवान हा सिनेमा लवकरच रिलीज होईल.  सिनेमात शाहरूखबरोबर अभिनेत्री नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि विजय सेतुपती हे कलाकार प्रमुख भुमिकेत असणार आहे. शाहरूखच्या पठाण सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता जवानही करेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जवान या सिनेमानं रिलीजआधीच कोटींची कमाई केली आहे. सिनेमांच्या निर्मात्यांना मोठा फायदा झाला आहे. सिनेमाचं म्युझिक कोटी रुपयांना विकण्यात आलंय. जवान सिनेमाचे  म्युझिक राइट्स खरेदी करण्यासाठी कंपनी आणि निर्मात्यांमध्ये मोठा करारा झाला. आधी पासून सिनेमाचे म्युझिक राइट्स खरेदी करण्यासाठी अनेक कपन्यांनी निर्मात्यांनी अप्रोच केलं होतं. मोठी स्पर्धा पाहायला मिळाली होती. पण अखेर भूषण कुमार यांच्या टी-सीरिजने यात बाजी मारली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, जवान सिनेमाचे म्युझिक राइट्स विकण्यात आलेत. जवान सिनेमाचं म्युझिक लेबल टी-सीरिजने तब्बल 36 कोटी रुपयांचा विकत घेतलेत. हेही वाचा -  Satyaprem ki Katha Box Office Collection : मराठमोळ्या दिग्दर्शकांचा पहिला हिंदी सिनेमा हिट; 2 दिवसात कोटींची कमाई शाहरुखच्या जवान सिनेमाच्या म्युझिक राइट्सच्या डिलने आधीचे अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केलेत. सिनेमाचं एकूण बजेट हे 220 कोटी आहे.  सिनेमाच्या म्युझिक राइट्सची किंमत पाहिली तर सिनेमानं रिलीजच्या अनेक महिने आधीच सिनेमाच्या बजेटच्या जवळपास जाणारी कमाई केली आहे. जवान हा सिनेमा 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

जवान हा एक अँक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे. शाहरुख सिनेमात जबरदस्त अँक्शन मोडमध्ये दिसणार आहे.  सिनेमाला अनिरुद्ध वकिचंदर यांनी म्युझिक दिलं आहे. तर शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. जवान सिनेमानंतर अभिनेता शाहरूख खान हा डंकी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  2023च्या शेवटी डंकी हा सिनेमा रिलीज होईल. या सिनेमात शाहरूखबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू प्रमुख भुमिकेत दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात