अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा हा सिनेमा अखेर 29 जून रोजी रिलीज झाला.
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या सिनेमाची प्रेक्षक अनेक वर्ष वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होताच दमदार कमाई करताना दिसतोय.
मराठमोळा दिग्दर्शक आणि बॉलिवूडमधील क्यूट जोडी असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरल्याचं दिसतंय.
कार्तिक आणि कियाराची जोडी या सिनेमानिमित्त एकत्र पाहायला मिळाली. दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री चांगलीच मिळून आली आहे.
सत्यप्रेम की कथा सिनेमाचं एकूण बजेट 60 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. फॅमिली ड्रामा आणि लव्ह स्टोरी सिनेमात दाखवण्यात आली आहे.
सत्य प्रेम की कथा सिनेमानं पहिल्या 9.25 कोटींची कमाई केली. अभिनेता कार्तिक आर्यनचा पहिल्या दिवशा सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा सिनेम ठरला आहे.