Home /News /entertainment /

अरे देवा आणखी एक कोरोना साँग! शाहरुखच्या 'सुनो ना...'चं नवं व्हर्जन, पाहा VIDEO

अरे देवा आणखी एक कोरोना साँग! शाहरुखच्या 'सुनो ना...'चं नवं व्हर्जन, पाहा VIDEO

बॉलिवूड गाण्यांच्या कोरोना व्हर्जनच्यामध्ये आता शाहरुख खानच्या 'चलते चलते' सिनेमातील 'सुनो ना सुनो ना' गाण्याची भर पडली आहे.

    मुंबई, 17 मार्च : जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसनं मनोरंजनसृष्टीला सुद्धा धडक दिली. काही हॉलिवूड कलाकारांना या व्हायरस लागण झाली आहे. अद्याप कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला याची लागण झाली नसली तरीही बॉलिवूड कोरोनाचा वेगळाच प्रभाव पडलेला पाहायला मिळत आहे. बॉलिवूडच्या गाण्यांवर कोरोना व्हर्जन तयार केली जात असून यातून सकारात्मक मेसेज देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या ही गाणी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. बॉलिवूड गाण्यांच्या कोरोना व्हर्जनच्यामध्ये आता शाहरुख खानच्या 'चलते चलते' सिनेमातील 'सुनो ना सुनो ना' गाण्याची भर पडली आहे. तेजस गंभीर नावाच्या एका मुलानं हे गाणं गायलं असून त्याला म्युझिक सुद्धा त्यानंच दिलं आहे. या गाण्याला तेजसनं कोरोना आणि मागच्या काही दिवसांपासून धार्मिक मुद्द्यांवरुन देशात सुरू असलेल्या वादाशी जोडलं आहे. हे गाणं तेजसनं त्याच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केलं आहे. रणबीर-आलियाचा KISS करतानाचा फोटो व्हायरल, पण मलायकाचं सिक्रेट झालं उघड तेजसनं या गाण्यात कोरोनामुळे देशातील लोकांच्या जीवनावर झालेल्या परिणामावर भाष्य केलं आहे. यासोबतच त्यानं गाण्याच्या शेवटी एक सुंदर मेसेज सुद्धा दिला आहे. हे गाणं शेअर करताना तेजसनं त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'देशातल्या सध्याच्या परिस्थितीवर काही ओळी लिहिल्या आहेत. केवळ मनोरंजन हाच या मागचा उद्देश आहे. स्वतःची काळजी घ्या आणि जात किंवा धर्माचा विचार न करता लोकांच्या वाईट काळात त्यांची मदत करा. देव सर्वांचं रक्षण करो.' Coronairus चं देशात थैमान, अमृता सुभाषनं शेअर केलेलं हे गाणं देईल नवी उमेद कॉपीराईट उल्लंघनाचा कोणताही हेतू नाही तेजसनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘हे मूळ गाणं ‘सुनो ना सुनो ना...’ अभिजित भट्टचार्य यांनी गायलं आहे. तर निर्मिती टी-सीरिजची आहे. माझा या गाण्याच्या कॉपीराइटचं उल्लंघन करण्याचा कोणताही हेतू नाही.’ शाहरुख खानचा चलते चलते जेव्हा रिलीज झाला होता त्यावेळी हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. याच गाण्याचा वापर करुन तेजसनं कोरोना व्हर्जन तयार केलं आहे. ज्यातून त्यानं एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जान्हवी कपूरनं शेअर केला बेडरुम VIDEO, दोस्ताना 2 च्या टीमची झाली पोलखोल
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Coronavirus

    पुढील बातम्या