मुंबई, 17 मार्च : सध्या जगभरात CoronaVirus नं अक्षरशः थैमान घातलं आहे. या व्हायरसमुळे जगात आतापर्यंत हजारोंच्या संख्येनं बळी गेले आहे. यातून सेलिब्रेटी सुद्धा सुटलेले नाहीत. महाराष्ट्रातील या व्हायरसच्या रुग्णांची संख्या 39वर पोहोचली असून नुकत्याच त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सरकार कडून याबबात टप्प्याटप्प्यानं पावलं उचलली जात असतानाचं सर्वजण या व्हायरस पासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आव्हान करत आहेत. अशात मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषनं तिच्या ट्वीटरवर एक प्रार्थना शेअर केली आहे. जी सर्वांनाच नवी उमेद देऊन जाते. अमृतानं तिच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केली आहे आणि यासोबतच तिनं व्हिडीओ शेअर केला आहे. जो तिच्या स्वतःच्या आवाजत आहे. या पोस्टमध्ये अमृतानं लिहिलं, हे गाणं माझा दिग्दर्शक मित्र सुनील सुकथनकरने लिहीलं आहे.आपण काळजी तर घेतोच आहोत. सर्वांच्या आरोग्यासाठी ही प्रार्थना. जान्हवी कपूरनं शेअर केला बेडरुम VIDEO, दोस्ताना 2 च्या टीमची झाली पोलखोल
हे गाणं माझा दिग्दर्शक मित्र सुनील सुकथनकरने लिहीलं आहे.आपण काळजी तर घेतोच आहोत. सर्वांच्या आरोग्यासाठी ही प्रार्थना 🙏
— Amruta Subhash (@AmrutaSubhash) March 17, 2020
This prayer is written by my director friend Sunil Sukhthankar. While we are taking care I thought these words would help .Stay safe. Blessings.🙏 pic.twitter.com/L16HouZdgC
अमृता सुभाषच्या आधी अनेक बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्हायरस बाबत काळजी घ्या अशा आशयाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यात प्रियांका चोप्रा, सलमान खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, सुबोध भावे, मिथिला पालकर, स्वप्नील जोशी इत्यादी कलाकारांचा समावेश आहे. या व्हायरसमुळे अनेक सिनेमांचे शो रद्द झाले आहे. जे पुन्हा प्रदर्शित केले जाणार आहेत. तर काही सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. टॉम हँक्सनंतर आता गेम ऑफ थ्रोन्सचा अभिनेता Coronavirus पॉझिटिव्ह चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूची दहशत जगभरात पसरली आहे. भारतासह जगातील अन्य देशांमध्ये सतत नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. चीनमध्ये या विषाणूमुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर इटली आणि इराणमध्येही दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे चीन आणि इटलीमधील परिस्थिती सहाव्या टप्प्यात पोहोचली आहे. तर भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. Coronavirus मुळे मुंबईत जिम बंद, जॅकलिननं शेअर केले HOT योगा व्हिडीओ