जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रणबीर-आलियाचा KISS करतानाचा फोटो व्हायरल, पण मलायकाचं सिक्रेट झालं उघड

रणबीर-आलियाचा KISS करतानाचा फोटो व्हायरल, पण मलायकाचं सिक्रेट झालं उघड

रणबीर-आलियाचा KISS करतानाचा फोटो व्हायरल, पण मलायकाचं सिक्रेट झालं उघड

आपलं खासगी आयुष्य नेहमीच सिक्रेट ठेवणाऱ्या मलायकाची आलिया-रणबीरच्या या फोटोमुळे पोलखोल झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटनं नुकताच तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला. आलियानं तिच्या बहिणीसोबतचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.मात्र त्यात तिचा बॉयफ्रेंड रणबीर कुठेच दिसत नव्हता. पण आता आलियाच्या बर्थडे पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात आलिया-रणबीरचा असा एक फोटो समोर आला आहे ज्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये रणबीर कपूर आलियाला किस करताना दिसत आहे. पण या फोटोची चर्चा आलिया-रणबीरच्या किसमुळे नाही तर एका वेगळ्याच गोष्टीमुळे होत आहे. या फोटोच्या बॅकग्राउंडला दिसत असलेल्या बी-टाऊनचं हॉट कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमुळे हा फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. ज्यात अर्जुन कपूर मलायका किस करताना दिसत आहे. हा फोटो नताशा पुनावालानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. जान्हवी कपूरनं शेअर केला बेडरुम VIDEO, दोस्ताना 2 च्या टीमची झाली पोलखोल तसं पाहायला गेलं तर रणबीर आलिया असो मग मलायका-अर्जुन दोन्ही कपल नेहमीच त्यांचं नातं खासगी ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र या फोटोमुळे मलायका अर्जुनच्या नात्याची एक नवी बाजू समोर आली आहे. मागच्या काही काळापासून या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू असून हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकावेत अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र या दोघांनी सध्या तरी लग्न करण्यास सपशेल नकार दिला आहे. टॉम हँक्सनंतर आता गेम ऑफ थ्रोन्सचा अभिनेता Coronavirus पॉझिटिव्ह

जाहिरात

रणबीर आलियाबद्दल बोलायचं तर हे दोघंही यंदाच्या वर्षात लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. सध्या हे दोघं त्यांच्या आगामी सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटिंगमध्ये बीझी आहेत. या सिनेमातून आलिया-रणबीर हे जोडी पहिल्यांदा ऑनस्क्रिन एकत्र दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमा बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं असून यात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, मौनी रॉय, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. Coronavirus मुळे मुंबईत जिम बंद, जॅकलिननं शेअर केले HOT योगा व्हिडीओ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात