जान्हवी कपूरनं शेअर केला बेडरुम VIDEO, दोस्ताना 2 च्या टीमची झाली पोलखोल

जान्हवी कपूरनं शेअर केला बेडरुम VIDEO, दोस्ताना 2 च्या टीमची झाली पोलखोल

जान्हवीचा एक बेडरुम व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यात तिनं आगामी सिनेमा ‘दोस्ताना 2’च्या टीमची पोलखोल केली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मार्च : बॉलिवूडची ‘धडक गर्ल’ जान्हवी कपूर सध्या तिचा आगमी सिनेमा ‘दोस्ताना 2’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. ती नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिच्या शूटिंगचे अपडेट्स शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी जान्हवीनं अमृतसरच्या स्वर्णमंदिराला भेट दिली होती. यावेळीचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर आता जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यात तिनं आगामी सिनेमा ‘दोस्ताना 2’च्या टीमची पोलखोल केली आहे.

जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ स्पॉटबॉय-ईनं त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती बेडरुमध्ये उभी असलेली दिसत आहे. ती शूटिंगसाठी तयार आहे मात्र तिचे क्रू मेंबर मात्र झोपलेले आहेत. हा व्हिडीओ जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘मी शूटिंगसाठी तयार आहे पण...’

Coronavirus मुळे मुंबईत जिम बंद, जॅकलिननं शेअर केले HOT योगा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी तिच्या शूटिंग गेटअपमध्ये दिसत आहे. तिनं यलो कलरचा कुर्ता घातला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडीओ पाहूनच लक्षात येतं की जान्हवी तिचा आगामी सिनेमा ‘दोस्ताना 2’साठी खूप उत्साहित आहे. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन म्हत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवी कपूरनं तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात धडक सिनेमातून केली होती. शशांक खेतानचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात इशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. जान्हवीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती ‘दोस्ताना 2’ व्यतिरिक्त ती ‘कारगिल गर्ल’, ‘रूही अफ्जा’, आणि ‘तख्त’ या सिनेमांमध्ये दिसणार आहे.

'खतरों के खिलाडी' कंटेस्टंटचा BOLD लुक, बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर VIRAL

First published: March 23, 2020, 11:06 AM IST

ताज्या बातम्या