मुंबई, 24 जून : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिची ड्रेसिंग स्टाइल, कधी सिनेमा तर कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट. आताही अशाच एका कारणानं प्रियांका पुन्हा चर्चेत आली आहे. प्रियांकाची ड्रेसिंग स्टाइल नेहमीच हटके असते. नुकत्याच समोर आलेल्या काही फोटोमधील प्रियांकाचा ड्रेस पाहिल्यावर तिच्या ड्रेसची तुफान चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या पॅरिसमध्ये फिरत आहेत. तुम्ही विचार करत असाल की, ते दोघं रोमँटिक हॉलिडेचा आनंद घेत असतील. पण खरं तर ते दोघं निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्या लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी येथे पोहोचले आहेत. यावेळेस प्रियांका आणि निक नुकतेच पॅरिसमध्ये फिरताना दिसले. यावेळी प्रियांकाचा हटके लुक पाहायला मिळाला. सेलिब हायलाईट या पेजवर तिचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
(वाचा: खऱ्या आयुष्यात शनायाचा 'हा' आहे गॅरी, सनईचौघडे लवकरच वाजणार?)
प्रियांकाने राखाडी रंगाचा जंपसूट आणि पांढऱ्या रंगाचे बुट घातले होते. तुम्ही या जंपसूटची किंमत ऐकून व्हाल थक्क. तिने परिधान केलेल्या जंपसूटची किंमत 1,03,951 रुपये एवढी आहे. तर तिने घातलेल्या पांढऱ्या बुटांची किंमत 65,708 रुपये आहे. एवढंच नाही तर, तिच्याकडील Christian Dior book tote oblique या हॅन्डबॅगची किंमत आहे चक्क 1,87,739 रुपये. आता तुम्हीच विचार करा देसी गर्ल प्रियांका तिच्या एका लुकसाठी किती खर्च करते.
(वाचा: बॉलिवूडमध्ये फक्त हिटच नाही तर फिटही आहे सलमान खान, हा घ्या पुरावा!)
दरम्यान, प्रियांकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देसी गर्ल प्रियांका लवकरच मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. 'द स्काई इज पिंक' या तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग तिनं पूर्ण केलं आहे. यामध्ये ती फरहान अख्तर आणि 'दंगल' फेम जायरा वसीमसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतचं या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून लवकरच हा सिनेमा 11 ऑगस्ट 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
VIDEO: तरुणांचा माज, बारमध्ये गोळ्या झाडत सुरू होता डान्स