जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ऐश्वर्यावरील ‘त्या’ कमेंटनंतर किंग खानच्या कानाखाली मारणार होत्या जया बच्चन!

ऐश्वर्यावरील ‘त्या’ कमेंटनंतर किंग खानच्या कानाखाली मारणार होत्या जया बच्चन!

ऐश्वर्यावरील ‘त्या’ कमेंटनंतर किंग खानच्या कानाखाली मारणार होत्या जया बच्चन!

काही वर्षांपूर्वी शाहरुखचं वर्तन बघून दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी चिडून, ‘शाहरुखच्या कानाखाली मारावसं वाटतं’ असं म्हटलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 नोव्हेंबर : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान आज 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखाला रोमान्सचा बादशाह म्हणूनही ओळखलं जातं. बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या शाहरुखला या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खूप मान आहे आणि सर्वच त्याच्याशी खूप अदबीनं वागतात आणि बोलतात. पण काही वर्षांपूर्वी त्याच्यासोबत असं काही झालं होतं की त्याचं बोलणं आणि वर्तन बघून सर्वांनाच धक्का बसला होता. इतकंच नाही तर दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी तर चिडून मला शाहरुखच्या कानाखाली मारावसं वाटतं असंही म्हटलं होतं. शाहरुख खाननं बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय सोबत अनेक सुपर हिट सिनेमात काम केलं आहे. ज्यात ‘जोश’, ‘मोहब्बतें’, ‘देवदास’ सारख्या सिनेमांचा समावेश आहे. त्यावेळी सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा होता. त्यावेळी ऐश्वर्या शाहरुख सोबत काम करत होती हे सलमानला आवडलं नाही आणि त्यानं सेटवर जाऊन शाहरुखला खूप सुनावलं. यामुळे ऐश्वर्यानं तर हा सिनेमा सोडलाच पण शाहरुखनं सुद्धा रागाच्या भरात ऐश्वर्यावर वाईट शब्दात कमेंट केल्या होत्या. शाहरुख-सलमानचा हा वाद त्यावेळी बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला. जेव्हा ही गोष्ट जया बच्चन यांना समजली तेव्हा त्यांनी मला शाहरुखच्या कानाखाली मारावसं वाटतं असं म्हटलं होतं. अभिनेत्री इलियाना डिक्रूज करणार होती आत्महत्या, केले स्फोटक खुलासे

जाहिरात

जया बच्चन म्हणाल्या, हो मी खरोखरंच त्याच्या कानाखाली मारेन. खरं तर अजून पर्यंत त्याची माझी भेट झाली नाही पण जेव्हाही मी त्याला भेटेन तेव्हा त्याला या वादाबद्दल विचारणार आहे. मी त्याला तसंच कानाखाली मारेन जसं मी माझ्या मुलाला मारते. माझं आणि शाहरुखचं नातं अगदी आई-मुलासारखं आहे. शाहरुख खाननं अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत कभी खुशी कभी गम या सिनेमात काम केलं होतं. त्यावेळी त्यानं अमिताभ-जया यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकरली होती. पण रिअल लाइफमध्येही शाहरुखचं त्यांच्याशी नातं तसंच आहे. सहाबहार अभिनेत्री रेखासारख्याच यशस्वी आहेत या तिच्या 6 बहिणी

याशिवाय जया बच्चन यांनी हॅप्पी न्यू ईयर सिनेमा रिलीज झाल्यानंतर शाहरुखवर निशाना साधला होता. त्या म्हणाल्या, ‘हा सिनेमा खूपच बकवास आहे. जर माझा मुलगा अभिषेक या सिनेमात नसता तर मी हा सिनेमा पाहायला कधीच गेले नसते.’ यानंतर शाहरुखनंही त्यांना उत्तर दिलं होतं. ‘अमिताभ बच्चन यांचा सिनेमा अमर-अकबर- अँथनी काही खूप खास नव्हता. मात्र आजही त्याला मोस्ट एंटरटेनिंग सिनेमा मानलं जातं’ असं शाहरुखनं म्हटलं होतं. मराठीचा चॉकलेट बॉय दिसणार हॉरर सिनेमात, स्वप्नील जोशीच्या ‘बळी’चं पोस्टर रिलीज ================================================================== VIDEO : ‘नेत्यांना सुबुद्धी देवो’ भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात