मराठीचा चॉकलेट बॉय दिसणार हॉरर सिनेमात, स्वप्नील जोशीच्या ‘बळी’चं पोस्टर रिलीज

मराठीचा चॉकलेट बॉय दिसणार हॉरर सिनेमात, स्वप्नील जोशीच्या ‘बळी’चं पोस्टर रिलीज

स्वप्नीलची प्रमुख भूमिका असलेला बळी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : मराठी सिने सृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी लवकरच एका हॉरर सिनेमात दिसणार आहे. स्वप्नीलची प्रमुख भूमिका असलेला एक वेगळा विषय मांडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बळी’ असं या सिनेमाचं नाव असून याचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं. स्वप्नीलनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर करत याची माहिती दिली. या सिनेमाचं दिग्दर्शन सुपरहिट मराठी सिनेमा ‘लपाछपी’ फेम विशाल फुरिया यांनी केले आहे.

'बळी' या सिनेमाच्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडत आहे, असं त्यातून समजतं. हा सिनेमा २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचंही पोस्टरवर दिसतं. हे पोस्टर पाहिल्यानंतर या सिनेमाची कथा काय असेल आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात ताणली गेली आहे.

निकसोबतचं लग्न टिकवण्यासाठी प्रियांकाचा आटापिटा, पाळतेय 'हा' नियम

 

View this post on Instagram

 

रक्ताच्या थारोळ्यातून उभा राहणार 'बळी'! स्वप्नील जोशी आणि 'लपाछपी' दिग्दर्शक विशाल फुरीया एकत्र! #Bali #FirstLookPoster Presented by @arjunsbaran & @kartiknishandar Produced by @gseamsak Directed by @furia_vishal @swwapnil_joshi in lead role.

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

या सिनेमाविषयी स्वप्नील जोशी सांगतो, ‘यंदाच्या वर्षी प्रगल्भ मराठी प्रेक्षकांनी चित्रपटांच्या नवनवीन प्रकारांना पाठबळ दिले आणि आपलेसे केले. त्यातील माझे एक छोटे योगदान म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून मी हॉरर सिनेमाकडे वळलो आहे. हा सिनेमा मला माझ्या आवडीच्या लोकांबरोबर करायची संधी मिळत असल्याचा अधिक आनंद मला आहे. कार्तिक आणि अर्जुन हे निर्माते आणि विशाल हे दिग्दर्शक, ही या क्षेत्रातील माझी आवडती माणसे आहेत. आमची ही टीम प्रेक्षकांना चांगलीच ‘घाबरवून’ सोडेल, याची मला पूर्ण खात्री आहे.’

KBC 11 : अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर पोहोचली मांजर आणि...

या सिनेमाचे दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी याआधी मराठी ‘लपाछपी’चे दिग्दर्शन केले होते. तो त्यांचा पहिला चित्रपट होता आणि तो विशेष गाजला होता. तर ‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

अर्जुनसोबत क्लिनिकमध्ये पोहोचली मलायका अरोरा, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

===================================================================

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 06:46 PM IST

ताज्या बातम्या