मुंबई 1 नोव्हेंबर : बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री इलियाना डिक्रूजने (ileana dcruz) गुरुवारी आपला 34वा वाढदिवस साजरा केला. इलियानाचा जन्म मुंबईत महिममध्ये एका रोमन कॅथलिक कुटुंबात झाला होता. रोनाल्डो डिक्रूज और समीरा असं तिच्या पालकांचं नाव आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री आयुष्याच्या सुरुवातीला एका आजाराने स्वत:च घायाळ झाली होती. इलायानाने तिच्याच आयुष्याबाबत अनेकदा स्फोटक खुलासे केले होते. इलियानाने सांगितलं होतं की काही वर्षांपूर्वी ती बॉडीडिसमॉर्फिक डिसऑर्डर या आजाराने ग्रासली होती. या काळात तिला नैराश्याने ग्रासलं होतं. तो काळ तिच्यासाठी अतिशय कठीण होता. या काळात तिला अनेकदा आत्महत्येचे विचारही येत असत. सगळं आयुष्य संपवावं असं तिला अनेकदा वाटत असे. आत्महत्येचा विचार वारंवार डोकं वर काढत असल्याने तिचं आयुष्य अतिशय खडतर बनलं होतं. मराठीचा चॉकलेट बॉय दिसणार हॉरर सिनेमात, स्वप्नील जोशीच्या ‘बळी’चं पोस्टर रिलीज मात्र औषधोपचार आणि मानसोपचाराने ती या सर्व संकटातून बाहेर पडली आणि आता तिने बॉलिवूडमध्ये चांगलंच बस्तान बसवलंय. 2006 मेध्ये इलियानाने तेलुगू फिल्म ‘देवदासु’पासून आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. या चित्रपटासाठी तिला दक्षिणेच्या फिल्मफेयर चा बेस्ट फीमेल डेब्यू हा पुरस्कार मिळाला होता. निकसोबतचं लग्न टिकवण्यासाठी प्रियांकाचा आटापिटा, पाळतेय ‘हा’ नियम तर बॉलीवूडमध्ये इलियानाचं करियर अनुराग बसू च्या ‘बर्फी’तून सुरू झालं. त्यात रणबीर कपूर आणि प्रियंका चोपड़ाची मुख्य भूमिका होती. तिच्या या अभिनयाची दखल बॉलिवूडनेही घेतली होती. 2017मध्ये दोन मोठे चित्रपट रिलीज झाले. त्यात अर्जुन कपूर सोबतचा ‘मुबारकां’ हिट ठरला होता. त्यानंतर अजय देवगनच्या ‘बादशाहो’मधलाही तिचा अभिनय गाजला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.