सहाबहार अभिनेत्री रेखासारख्याच यशस्वी आहेत या तिच्या 6 बहिणी

सहाबहार अभिनेत्री रेखासारख्याच यशस्वी आहेत या तिच्या 6 बहिणी

रेखाचं आणि तिच्या वडिलांचं फारसं पटलं नाही. मात्र तिच्या सर्व भावंडांसोबत तिचं चांगलंच मेतकूट आहे.

  • Share this:

मुंबई 1 नोव्हेंबर : बॉलिवुडची सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) विषयी लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. कायम आपलं खासगीपण जपणाऱ्या रेखाच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना आवडत असतं. त्यामुळे कायम तिचं खासगी आयुष्य आणि कुटुंबाबद्दल नव नव्या गोष्टी बाहेर येत असतात. रेखा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी टीव्हीवरचे शो आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात तिची उपस्थिती कायम असते. त्यामुळे रेखाचं ग्लॅमर अजुनही कमी झालेलं नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते रेखाच्या खासगी आयुष्याबद्दल आणि तिच्या बहिणींबद्दल.

मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर, Panipat चं पहिलं पोस्टर रिलीज

रेखाची काही लग्न झालीत पण ती टिकू शकली नाहीत. त्याच्याही अनेक कहाण्या चर्चेत असतात. रेखा सध्या एकटीच मुंबईत राहत असली तरी तिचं कुटुंब हे मोठं आहे. तिला सहा बहिणी असून त्या सर्व आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. रेखाने अतिशय कमी वयात चित्रपटांमध्ये कामाला सुरुवात केलीय. आणि तिच्या बहिणींनाही तिने मदत केलीय.

‘ती अजूनही माझ्या कवेत आहे’, विवेकच्या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती धमकी

रेखाचे वडिल जेमिनी गणेशन  हे तामिळ चित्रपटसृष्टीतले एक दिग्गज होते. त्यांची तीन लग्न झाली. त्यांना पहिल्या पत्नीपासून चार, दुसऱ्या पत्नीपासून रेखा आणि राधा या दोन मुली, तिसऱ्या पत्निपासून विजया चामुंडेश्वरी आणि मुलगा सतीश. रेखाचं आणि तिच्या वडिलांचं फारसं पटलं नाही. मात्र तिच्या सर्व भावंडांसोबत तिचं चांगलंच मेतकूट जमतं. तिच्या सहा बहिणींची नावं अशी आहेत जया श्रीधर, नारायणी गणेशन, विजया चामुंडेश्वरी, रेवती स्वामीनाथन, राधा उस्मान सैयद आणि कमला सेल्वराज.

अर्जुनसोबत क्लिनिकमध्ये पोहोचली मलायका अरोरा, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

रेवती स्वामीनाथन ही रेखाची सर्वात मोठी बहिण आहे. ती अमेरिकेत डॉक्टर आहे. रेखाची दुसरी बहिण कमला सेल्वराज भारतातली विख्यात डॉक्टर आहे. तिचं चेन्नईत हॉस्पिटल आहे. रेखाची तीसऱ्या क्रमांकाची बहिण आहे नारायणी गणेश ती आघाडीच्या वृत्तपत्रात स्तंभलेखिका आहे.  रेखाची सख्की बहिण राधाही एक अभिनेत्री असून तिने लग्नानंतर चित्रपटात काम करणं बंद केलंय. या सगळ्याच बहिणी आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध असून रेखाला कायम आपल्या बहिणींचं कौतुक असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rekha
First Published: Nov 1, 2019 10:02 PM IST

ताज्या बातम्या