जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ...तर मग 60 वर्षांवरील राजकारण्यांनीही राजीनामे द्यावे, विक्रम गोखलेंचा संतप्त टोला

...तर मग 60 वर्षांवरील राजकारण्यांनीही राजीनामे द्यावे, विक्रम गोखलेंचा संतप्त टोला

...तर मग 60 वर्षांवरील राजकारण्यांनीही राजीनामे द्यावे, विक्रम गोखलेंचा संतप्त टोला

देशभरात आता अनेक ठिकाणी मालिका-सिनेमांच्या शूटिंगला काही अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै : कोरोनाच्या संकटकाळात व्हायरसचं (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मालिका, सिनेमा, वेब सीरिज यांचे शूटिंग बंद ठेवण्यात आले आहे. आता या चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर टेलिव्हिजनवर काही मालिका पुन्हा नव्याने सुरू देखील झाल्या आहेत. मात्र  शूटिंग करताना काही नियमांचे पालन व्यवस्थापन, कलाकार आणि क्रू मेंबर्सकडून करणे अनिवार्य असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये महत्त्वाचा नियम म्हणजे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने 65 वर्ष आणि त्यापेक्षा वय असणाऱ्या कलाकारांना शूटिंग सेटवर येण्याची परवानगी नाकारली आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी विरोध केल्याची माहिती एका मीडिया अहवालानुसार समोर आली आहे. (हे वाचा- अग्गबाई सासूबाई’ संदर्भातील संतप्त प्रतिक्रियेनंतर का होत आहेत गिरीश ओक ट्रोल ) दरम्यान केंद्राच्या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकार याबाबत कायदा करणार असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. टीव्ही9 मराठीने यााबाबतचे वृ्त्त प्रसारित केले आहे. असा कायदा आणण्याआधी राजकारणातील 60 वयवर्षापुढील नेत्यांनीही राजीनामे द्यावे. अशी तिखट प्रतिक्रिया विक्रम गोखले यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी निवृत्त व्हावे, असा सल्लाच गोखले यांनी दिला आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की यामुळे ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. 65 वर्षांपुढील कलाकार आपापली काळजी घेऊन काम करतील, त्यामुळे त्या्ंना काम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी गोखले यांनी केली आहे. (हे वाचा- सुशांतचा शेवटचा सिनेमा Dil Bechara हॉटस्टारवर फ्री उपलब्ध असूनही झाला लीक ) सध्या काही मालिका, वेब सीरिज, चित्रपट या सर्वांचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक कलाकारांना आणि सेटवरील कर्मचाऱ्यांना काम मिळाले आहे. त्यामुळे कलाविश्वात काहीसा आनंद आहे. मात्र ज्येष्ठ कलाकारांना अद्याप काम करता येत नसल्यामुळे काही प्रमाणात नाराजीचा सूर देखील ऐकू येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात