मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुशांतचा शेवटचा सिनेमा Dil Bechara हॉटस्टारवर फ्री उपलब्ध असूनही झाला लीक

सुशांतचा शेवटचा सिनेमा Dil Bechara हॉटस्टारवर फ्री उपलब्ध असूनही झाला लीक

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा देखील काही टोरेंट साइटवर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. सिनेमा फ्री उपलब्ध असूनही लीक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा देखील काही टोरेंट साइटवर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. सिनेमा फ्री उपलब्ध असूनही लीक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा देखील काही टोरेंट साइटवर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. सिनेमा फ्री उपलब्ध असूनही लीक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई, 25 जुलै : सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा (Dil Bechara) शुक्रवारी संध्याकाळी डिझ्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) प्रदर्शित झाला. त्यानंतर काही तासात हॉटस्टार क्रॅश झाल्याच्या तक्रारी देखील अनेक युजर्सनी केल्या होत्या. मात्र यानंतर एक वाईट बाब समोर येत आहे. एका मीडिया अहवालानुसार हॅकर्सनी हा सिनेमा देखील सोडला नाही, ही फिल्म टोरेंट साइटवर (Torrent) लीक झाली आहे.

पिंकव्हिलाच्या एका अहवालानुसार मुकेश छाब्रा (Mukesh Chabra) दिग्दर्शित या सिनेमाचे लीक व्हर्जन हाय डेफिनेशन (HD) क्वालिटीचे आहे. हा सिनेमा तमिल रॉकर्स या टोरंट साइटवर प्रदर्शनाच्या काही तासांतच उपलब्ध झाली होती. सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा सिनेमा असल्यामुळे चाहत्यांनी तो सिनेमागृहात प्रदर्शित व्हावा अशी मागणी केली होती. मात्र कोरानाच्या संक्रमण रोखण्यासाठी अद्याप सिनेमागृहं उघडण्यात आली नाही आहेत. परिणामी या सिनेमाच्या मेकर्सनी सिनेमा ओटीटी वर प्रदर्शित करण्यााच निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे चाहत्यांसाठी हा सिनेमा फ्री मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्थात हा सिनेमा पाहण्याासाठी तुम्हाला डिझ्नी प्लस हॉटस्टारच्या सब्सक्रिप्शनची गरज नाही आहे. सिनेमा फ्री उपलब्ध असूनही लीक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(हे वाचा-सुशांतचा शेवटचा सिनेमा Dil Bechara च्या रिलीजनंतर काही तासातच Hotstar क्रॅश!)

सुशांतच्या या सिनेमाने काही तासांतच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाला आतापर्यंतIMDb वर 10 पैकी 10 रेटिंग मिळाले आहेत, जे आतापर्यंत कोणत्याच सिनेमाला मिळाले नाही आहे. सुशांतच्या अभिनयाचे देखील यामध्ये खूप कौतुक होत आहे, मात्र ते पाहण्यासाठी तो आज नाही याची खंत सर्वजण व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार युजर या सिनेमाबाबत IMDb वर एकाचवेळी रेटिंग देण्यासाठी प्रयत्न करत होते असल्यामुळे काही वेळासाठी IMDb ची साइट देखील हँग झाली होती. या सिनेमासाठी त्याचे चाहते कमालीचे उत्सुक होते. मात्र त्यांच्या लाडक्या 'मानव'चा हा शेवटचा सिनेमा आहे, यावर मात्र अद्याप कुणाचा विश्वास बसत नाही आहे.

(हे वाचा-सेम टू सेम! सुशांत ते रणबीरपर्यंत, कलाकारांसारखेच दिसणारे सोशल मीडियावर VIRAL)

सुशांतचा हा सिनेमा 2014 मध्ये आलेल्या हॉलीवुड सिनेमा 'द फॉल्‍ट इन अवर स्‍टार्स' वर आधारित आहे. यामध्ये किझी आणि मॅनी या जोडीची कहाणी दाखवण्यात आली आहे. किझी बासूची भूमिका संजना सांघी हिने साकारली आहे. यामध्ये किझी कॅन्सरशी झूंज देत असते आणि तिच्या आयुष्यात मॅनीची एंट्री होते. प्रेमाची एक सुंदर कहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

First published:

Tags: Sushant Singh Rajput