Home /News /entertainment /

'तुमच्यासाठी जीव धोक्यात घालून शूटिंंगला जातो', या संतप्त प्रतिक्रियेनंतर का होत आहेत गिरीश ओक ट्रोल

'तुमच्यासाठी जीव धोक्यात घालून शूटिंंगला जातो', या संतप्त प्रतिक्रियेनंतर का होत आहेत गिरीश ओक ट्रोल

'अग्गबाई सासूबाई' ही मालिका जशी टीआरपी रेटिंगमध्ये सर्वोच्च मालिकांपैकी एक आहे, त्याचप्रमाणे या मालिकेवर बनणाऱ्या मिम्सची देखील संख्या खूप आहे. अशाच एका पोस्टवर अभिनेते गिरीश ओक यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 25 जुलै : गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या मालिकांचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. काही मालिका नव्या जोमाने टेलिव्हिजनवर दिसू देखील लागल्या आहे. 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेचे शूटिंग देखील पुन्हा सुरू झाले आहे. या मालिकेतील बबड्या उर्फ आशुतोष पत्की याने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका जशी टीआरपी रेटिंगमध्ये सर्वोच्च मालिकांपैकी एक आहे, त्याचप्रमाणे या मालिकेवर बनणाऱ्या मिम्सची देखील संख्या खूप आहे. 'बबड्या' या भूमिकेबाबत तर शेकडो मिम्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान अशाच एका पोस्टवर मालिकेतील मुख्य कलाकार अभिनेते डॉ. गिरीश ओक (Dr. Girish Oak) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुरुवातीला काहीशी उपहासात्मक वाटणाऱ्या प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांना देखील ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले आहे. (हे वाचा-सेम टू सेम! सुशांत ते रणबीरपर्यंत, कलाकारांसारखेच दिसणारे सोशल मीडियावर VIRAL) दरम्यान निशा सोनटक्के या महिलेने फेसबुकवर 'अग्गबाई सासूबाई'वर असंच एक Meme शेअर केलं होतं आणि त्यावर एक उपहासात्मक कॅप्शन देखील लिहिलं होतं. यावर गिरीश ओक यांनी अशी कमेंट केली की, 'मधे लाॅकडाउनचा काळ जाऊनही अजून तशीच आतशबाजी सुरू आहे हे बघून बरं वाटलं'. दरम्यान यावर निशा यांनी आणखी एक रिप्लाय दिला की, 'कदाचित तुम्हाला राग येत असेल..पण माझी पोस्ट आलीच नाही तर,लगेच मला मेसेज चालू होतात निशाताई कुठे आहेस..खर तर केवढी जाहीरात आम्ही करतो. तुमच्या डायरेक्टर ना सांगा. आमच्या गँगला पार्टी हवी. परत पुरस्कार असतात तेव्हा आमच्या खुर्च्या राखीव हव्यात केवढी गँग जमवलीय बघा'. (हे वाचा-सुशांतचा शेवटचा सिनेमा Dil Bechara च्या रिलीजनंतर काही तासातच Hotstar क्रॅश!) यावर डॉ. गिरीश ओक यांनी केलेली कमेंट पाहून त्यांना हे म्हणणे रुचले नसावे असे दिसतेय. 'निशा तुमचा वेळ मजेत जातोय नं? मग झालं तर वर पार्टी राखीव खुर्च्या म्हणजे जरा जास्तच होतंय. उलट तुम्हीच आमचे आभार मानले पाहिजेत काहीही (बुध्दीही) खर्च न करता वेळ मजेत जातोय तुमचा. तुमच्या या मनोरंजनाच्या खाद्याकरता आम्हाला जिवावर उदार होऊन रोज शूटला बाहेर पडावं लागतंय', असा रिप्लाय गिरीश ओक यांनी दिला. गिरीश ओक यांच्या या टिप्पणीवर अनेक तिखट रिप्लाय प्रेक्षकांनी दिले आहेत. काहींनी तर ही मालिका आवडतच नसल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान फेसबुकवर याबाबत बरीच मोठी चर्चा रंगल्याचेही पाहायला मिळत आहेत. निशा यांच्या पोस्टवर जवळपास 400 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. डॉ. गिरीश ओक आणि निशा यांमधील संभाषण देखील कमेंट बॉक्समध्ये बरेच लांबल्याचे यावेळी पाहायला मिळाले. इतर काही जणांनी देखील केलेल्या कमेंट्समुळे गिरीश ओक यांना ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या