मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kareena Kapoor Tested Corona Positive: अभिनेत्री करीना कपूर कोरोना पॉझिटिव्ह, बॉलिवूडकरांना पार्ट्या भोवणार?

Kareena Kapoor Tested Corona Positive: अभिनेत्री करीना कपूर कोरोना पॉझिटिव्ह, बॉलिवूडकरांना पार्ट्या भोवणार?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Tested Corona Positive) हिला कोरोनाची लागण झाली आहे. करीनासह तिची जवळची मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे.

मुंबई, 13 डिसेंबर: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Tested Corona Positive) हिला कोरोनाची लागण झाली आहे. करीनासह तिची जवळची मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. बीएमसी सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाचे संक्रमण काही प्रमाणात कमी झाल्यानंतर बॉलिवूडकरांनी पार्ट्या आयोजित करण्यास सुरुवात केली होती. याच मुळे करीना आणि अमृता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. आयोजित पार्ट्यांमुळे या दोघी कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेने यासंदर्भात काँटॅक्ट ट्रेसिंग करण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून दोघींना कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली, जी पॉझिटिव्ह आली आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा गेल्या काही दिवसांपासून विविध पार्ट्यांमध्ये (Bollywood Parties) दिसल्या होत्या. ज्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कलाकार मंडळी सहभागी झाले होते, त्यामुळे आता अमृता आणि करीना सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे सूत्रांनी व्यक्त केली आहे. NEWS18 LOKMAT ला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, यामध्ये सहभागी झालेल्या बॉलिवूडकरांनी कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. यापैकी देखील काही बॉलिवूड कलाकार पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबत सविस्तर माहिती समोर येऊ शकते.

हे वाचा-राजकुमारी सारखीच दिसतेय 'Vicky की दुल्हन', कतरिनाने अशी केली लग्नमंडपात एंट्री

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला सातत्याने कोविड 19 संसर्ग होऊ नये यासाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्यासाठी आवाहन करतायेत. मुंबई महापालिका असेल किंवा आरोग्य विभाग असेल ज्या पोटतिडकीने कोविड 19 संसर्गा रोखण्यासाठी जीवाचा आटापीटा करतायेत. मात्र दूसरीकडे जनतेच्या गळ्यातील ताईत असलेले सूपरस्टार कोविड 19 प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत त्यांचे पार्टी लाईफ सुरू ठेवत आहेत. त्याचाच असा परिणाम आता दिसू लागलांय.

हे वाचा-'...तूच तुझा आवाज आहेस', सर्वच महिलांनी ऐकावा Miss Universe 2021 चा हा सल्ला

या दोनही अभिनेत्री ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत त्या सर्वांची आता कोविड 19 चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. आज आणखी काही बाँलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट मिळतील. ज्यामध्ये काही मोठ्या बॉलिवूड सूपरस्टार्सची नावं असल्याची माहिती मिळते आहे.

First published:

Tags: Kareena Kapoor