Home /News /entertainment /

पार्टीमुळे नाही, त्या व्यक्तीमुळे कोरोना झाला - करीनाने दिली पहिली प्रतिक्रिया

पार्टीमुळे नाही, त्या व्यक्तीमुळे कोरोना झाला - करीनाने दिली पहिली प्रतिक्रिया

करीना कपूर (Kareena Kapoor Tested Corona Positive) हिला कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरच्या पार्टीमुळे तिला कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर करीनाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  मुंबई, 13 डिसेंबर: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Tested Corona Positive) हिला कोरोनाची लागण झाली आहे. करीनासह तिची जवळची मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. बीएमसी सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाचे संक्रमण काही प्रमाणात कमी झाल्यानंतर बॉलिवूडकरांनी पार्ट्या आयोजित करण्यास सुरुवात केली होती. याच मुळे करीना आणि अमृता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.  करण जोहरच्या पार्टीमुळे तिला  कोरोना झाल्याची चर्चा आहे.  या सगळ्या चर्चेनंतर करीनाने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. करीनाच्या अधिकृत प्रवक्त्याने याचं खरं कारण सांगितलं आहे.  पार्टीमुळे नाही तर एका  व्यक्तीमुळे तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. करीनाच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात करीनाने कोरोनाबद्दल योग्य ती काळजी घेतली होती. ती प्रत्येक वेळी बाहेर पडताना काळजी घेत असे. दुर्दैवाने, यावेळी तिला आणि अमृता अरोराला एका डिनर पार्टीमध्ये कोविड झाला. जेथे काही मित्र देखील जमले होते. त्यामध्ये , एक व्यक्ती अशी होती जिला काहीसं अस्वस्थ वाटत होते आणि खोकला होता. ज्यामुळेच कोरोनाचा प्रसार झाला. या व्यक्तीला खरं तर याची जाणीव असायला होती. त्याने या डिनर पार्टीला हजेरीच लावयाल नको होती.मात्र त्याच्या अशा वागण्यामुळे इतरांना कोरोनाची लागण झाल्याची करीनाच्या प्रवक्तत्याकडून सांगण्यात आलं आहे. वाचा : अभिनेत्री करीना कपूर कोरोना पॉझिटिव्ह, बॉलिवूडकरांना पार्ट्या भोवणार? त्याने पुढे सांगितले की, तिची चाचणी पॉझिटिव्ह येताच तिने स्वत:ला वेगळे ठवले आहे. ती सध्या योग्य ती खबरदारी घेत नियमांचे पालन करत आहे.करीना एक जबाबदार नागरिक आहे आणि तिला तिच्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी  आहे. त्यामुळे तिला दोष देणे योग्य नाही. ती एक जबाबदार नागरिक आहे आणि तिला त्याची जाणीव असल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र ती व्यक्ती कोण आहे याचा मात्र खुलासा झालेला नाही.
  या दोनही अभिनेत्री ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत त्या सर्वांची आता कोविड 19 चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. आज आणखी काही बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट मिळतील. ज्यामध्ये काही मोठ्या बॉलिवूड सूपरस्टार्सची नावं असल्याची माहिती मिळते आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Corona, Entertainment, Kareena Kapoor

  पुढील बातम्या