मुंबई 03 ऑगस्ट : ‘भुज : दी प्राइड ऑफ इंडिया’ या अजय देवगण (Ajay Devgan) आणि सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) नव्या चित्रपटाचा (Bhuj : The pride of India) पहिला ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर (Bhuj Movie second trailer) आज रिलीज झाला आहे. पहिल्या ट्रेलरप्रमाणेच याही ट्रेलरला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून 13 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित (Bhuj Movie release date) होणार आहे. अभिषेक दुधैया यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातली कथा (Bhuj movie story) दाखवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलातले अधिकारी आणि देशाच्या नागरिकांनी मिळून केलेली एक दमदार कामगिरी या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे, जी खरंच घडली होती यावर पटकन विश्वासही बसणार नाही.
PHOTOS: 'आणि काय हवं?'...प्रिया-उमेशचा पुन्हा एकदा रोमँटिक अंदाज
पहिल्या ट्रेलरप्रमाणे दुसऱ्या ट्रेलरमध्येही अजय देवगणचे दमदार डायलॉग्ज (Bhuj movie dialogs) पाहायला मिळतात. यातला एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Bhuj movie Shivaji Dialogue) होतो आहे. “हम उस महा छत्रपती शिवाजी की औलाद हैं, जिन्होंने मुगलों को घुटनों पर ला दिया था और अपने खून से हिंदुस्तान का इतिहास लिखा था।” हा डायलॉग ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत होत आहे.
‘भुज : दी प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात भारतीय हवाई दलातले शूर अधिकारी विजय कर्णिक (Vijay Karnik Bhuj) यांची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट भारत-पाक युद्धातल्या काही सत्य घटनांवर आधारित आहे. पाकिस्तानने भारतावर (Bhuj India Pakistan War) हल्ला केला, तेव्हा विजय कर्णिक हे भुज येथील हवाई तळाचे प्रमुख होते. या हल्ल्यानंतर हा हवाई तळ नष्ट झाला होता; मात्र जवळच असलेल्या माधापार गावातल्या 300 महिलांच्या मदतीने कर्णिक यांनी हा पूर्ण हवाई तळ (Bhuj Air base story) पुन्हा उभारला होता.
सोनू सूद नावाचा 'मसीहा' आता गायब का? बॉलिवूडकरांवर बरसल्या शालिनी ठाकरे
इतिहासातली ही महत्त्वाची आणि रोमहर्षक घटना तुम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर पहायला मिळणार आहे. 13 ऑगस्ट रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी अजय देवगण अभिषेक बच्चनसोबत ‘दी बिग बुल’मध्ये झळकला होता. यामधल्या त्याच्या कामाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. आता भुज या सिनेमामधून पुन्हा तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगण आणि सोनाक्षीसोबतच या चित्रपटामध्ये संजय दत्त (Sanjay Dutt in Bhuj), नोरा फतेही यांसारखे कलाकारही आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.