मुंबई 03 ऑगस्ट : अतिवृष्टीनं राज्यात अक्षरशः कहर (Heavy Rain) केला होता. अनेक जिल्ह्यांना महापूराचा (Flood in Maharashtra) मोठा फटका सहन करावा लागला. अनेकांची घरं उद्धवस्त झाली तर कित्येकांना आपल्या घरातील सदस्य गमवावे लागले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या परीनं प्रयत्न केले. मात्र, या काळात बॉलिवूड कलाकार (Bollywood Celebrities) मात्र पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्याचं चित्र फारसं पाहायला मिळालं नाही. याच मुद्दयावरुन आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी बॉलिवूड कलाकारांवर टीका केली आहे.
Inside Video'..पंतप्रधान पाणीही विचारत नाही', संजय राऊत यांनी व्यक्त केली नाराजी
शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं, की कोरोना काळात सोनू सूद (Sonu Sood) नावाच्या एका महान मसीहाचा जन्म झाला होता. मात्र, कोकणात पूरस्थिती असताना हे महात्मे गायब होतात. मुंबईत राहून, इथे पैसे कमवून यांची समाजसेवा केवळ राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का? असा सवाल शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केला आहे.
कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?#KonkanFlood #SonuSood #WhereIsMashiha @SonuSood @mnsadhikrut pic.twitter.com/ucTAknzQ3c
— Shalini Thackeray (@ThakareShalini) August 3, 2021
ओसामा बिन लादेनच्या भावाच्या आलिशान हवेलीचा होणार लिलाव; किंमत ऐकून बसेल धक्का
मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी हिंदी चित्रपटसृष्टी महाराष्ट्रामध्ये आलेल्या पुराबाबत असंवेदनशीलपणे वागत असल्याची टीका केली आहे. सोबतच महाराष्ट्रात इतका मोठा पूर आला पण चित्रपटसृष्टीने त्यात कुठल्याच प्रकारची मदत केलेली नाही, त्यामुळे त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः यावेळी त्यांनी कोरोना काळात अभिनेता सोनू सूदनं केलेल्या कार्याचाही उल्लेख केला आहे. बाहेरील राज्यातील लोकांच्या मदतीसाठी सरसावणारे बॉलिवूड कलाकार महाराष्ट्राला कठीण काळात मदत करत नसल्याचा आरोप, शालिनी ठाकरे यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Rain flood, Sonu Sood