‘सह्याद्री देवराई’, मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा पर्यावरण पूरक प्रयत्न

‘सह्याद्री देवराई’, मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा पर्यावरण पूरक प्रयत्न

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ते बीड येथे महाराष्ट्रातलं पहिलं वृक्ष संमेलन सुद्धा घेणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर: सध्या देशाभरात सर्वच स्तरातून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. ग्लोबल वर्मिंग आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. उशीरा का असेना सर्वांनाचं आता शाहणपण सुचलेलं आहे. या सेलिब्रेटी सुद्धा मागे नाहीत. मराठी सिने सृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे यासाठी आवाज उठवला आहे. ‘मी अन् माझे’ इतकाच संकोचित विचार न करता प्रत्येकाने पर्यावरणाच्या समर्थनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून ती जगवावीत, असे सांगत आणि ‘येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहेच कोण!’ अशी घोषणा देत चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पात वृक्ष संगोपनाची चळवळ गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेचं जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ते बीड येथे महाराष्ट्रातलं पहिलं वृक्ष संमेलन सुद्धा घेणार आहेत.

बीड शहराजवळ पालवण येथील वनविभागाच्या दोनशे हेक्टर परिसरात मागील काही दिवसांपासून ‘सह्याद्री देवराई’ हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून या ठिकाणी काम सुरू केले आहे. विविध जातीच्या पावणे दोन लाख वृक्षांची या ठिकाणी लागवड करण्यात आली असून काही दिवसात हा ऑक्सिजन झोन तयार होईल, असा मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सह्याद्री देवराई प्रकल्पात भेट देत सयाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शासन आणि लोकसहभागातून प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन-अनुराग कश्यप यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, वाचा काय आहे कारण

‘मी आणि माझं’ एवढाच मर्यादित विचार न करता झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचं महत्त्व लक्षात घेऊन झाडे जगवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन सयाजी शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील पहिले वृक्ष संमेलन जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात देवराई प्रकल्पात घेण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. या संमेलनाला राज्यभरातील पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित राहणार असून वृक्ष पालखी काढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

VIDEO : काका-मामानंतर आता सलमान खानला व्हायचंय ‘बाबा’, स्वतःच केला खुलासा

NETFLIX वादाच्या भोवऱ्यात, येशू ख्रिस्तांना समलैंगिक म्हटल्यानं संताप अनावर

First Published: Dec 28, 2019 05:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading