मुंबई, 28 डिसेंबर : बॉलिवूडचा चुलबूल पांडे अर्थात सुपरस्टार सलमान खाननं नुकताच 54 वा वाढदिवस साजरा केला. यंदाचा वाढदिवस सलमानसाठी खूपच खास ठरला. कारण त्याची बहीण अर्पिता खाननं गोंडस मुलीला जन्म देत सलमानला सर्वात मौल्यवान गिफ्ट दिलं. बहिणीकडून मिळालेल्या गिफ्टमुळे सलमान खान खूप खूश आहे. अशातच त्यानं काका-मामा झाल्यानंतर आता बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सलमानचा हा लेटेस्ट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खानच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस मुंबईतील एका स्टुडिओमध्ये साजरा केला. त्यावेळी सलमाननं त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यानं सांगितलं की अर्पिता आणि आयुषच्या मुलीसाठी सलमानचे वडील सलीम खान यांनी सिफारा आणि आयत अशी दोन नावं सुचवली होती. त्यावर अर्पितानं आयत हे नाव निवडलं. हे खूपच सुंदर नाव आहे असंही सलमान यावेळी म्हणाला. कुशल पंजाबी आत्महत्या : ‘तू माझा मुलगा…’, मित्राचा हात पकडून ढसाढसा रडली आई
यावेळी सलमानला आजच्या दिवसाची सुरुवात तू कशी केलीस असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सलमान म्हणाला, मी सकाळी उठलो आणि माझा फोन पाहिला. माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी यापेक्षा जास्त मौल्यवान कोणतंच गिफ्ट असू शकत नाही. त्यानंतर एका रिपोर्टरनं सलमानला विचारलं दुसऱ्यांदा मामा झाल्यावर तुला कसं वाटतं आहे. त्यावर तो म्हणाला, आता झालं ना मामा-काका आता फक्त बाबा व्हायचंय. कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर अभिनेता रोहित रॉयनं का मागितली माफी
सलमानचा नुकताच रिलीज झालेला दबंग 3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमातील सलमानच्या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. या सिनेमाचं एकूण बजेच 100 कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान शुक्रवारी या सिनेमाची कमाई 3 कोटी रुपये झाली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं असून सलमान व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि किच्चा सुदीप यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर Ex गर्लफ्रेंड म्हणते…