जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / NETFLIX वादाच्या भोवऱ्यात, येशू ख्रिस्तांना समलैंगिक म्हटल्यानं संताप अनावर

NETFLIX वादाच्या भोवऱ्यात, येशू ख्रिस्तांना समलैंगिक म्हटल्यानं संताप अनावर

NETFLIX वादाच्या भोवऱ्यात, येशू ख्रिस्तांना समलैंगिक म्हटल्यानं संताप अनावर

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या एका सिनेमाविरोधात हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 डिसेंबर : डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारे अनेक सिनेमा किंवा वेब सीरिज अनेकदा त्यातील कन्टेन्टमुळे टीकेचा बळी ठरतात. असंच काहीसं नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या एका सिनेमाबाबत घडलं आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्म नुकताच रिलीज झालेला ब्राझिलियन सिनेमा ‘फर्स्‍ट टेंपटेशन ऑफ क्राइस्‍ट’च्या विरोधात हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले आहेत. या सिनेमात येशू ख्रिस्तांना(Jesus) समलैंगिक दाखवण्यात आलं आहे असा या सिनेमाच्या निर्मात्यांवर आरोप केला जात आहे. ‘फर्स्‍ट टेंपटेशन ऑफ क्राइस्‍ट’ या ब्राझिलियन सिनेमाची निर्मिती ‘पोर्टा फंडोज’नं केली आहे. ‘पोर्टा फंडोज’या कॉमेडी ग्रुपला 2018 मध्ये ख्रिसमसवर आधारित तयार केलेल्या एका सिनेमाला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर अभिनेता रोहित रॉयनं का मागितली माफी

‘फर्स्‍ट टेंपटेशन ऑफ क्राइस्‍ट’मधील एका दृश्यात येशू ख्रिस्त त्यांच्या एका समलैंगिक मित्राला घरी घेऊन आल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसेच सिनेमाच्या ट्रेलरमध्येही अशीच काहीशी दृश्य आहेत. त्यानंतर ते त्या मित्राची घरातील सदस्यांनाशी ओळख करुन देताना दिसत आहे. कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर Ex गर्लफ्रेंड म्हणते… या सिनेमाला सर्वच स्तरातून खूप विरोध केला जात आहे. जवळपास 23 लाख लोकांनी नेटफ्लिक्सकडे हा सिनेमा या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्याची मागणी केली आहे. यासाठी लेखी पत्र लिहून त्यावर लोकांच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्या आहेत. तसेच या सिनेमाच्या विरोधात ब्राझीलमध्ये फायर बॉम्ब हल्ला सुद्धा झाला आहे. तणावमुक्त राहायचंय? मग फॉलो करा इम्रान हाश्मीचा सोपा डाएट प्लान

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात