मुंबई, 17 मे : सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी लढत आहे. लॉकडाऊन केलेलं असतानाही देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्यामुळे रुग्णालयात रुग्णांची कूप गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. अशात प्रसिद्ध अभिनेता सत्यजीत दुबेच्या 54 वर्षीया आईची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सत्यजीतनं त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. आता त्यांना मुंबईच्या एका रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे मात्र जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा त्यांना बेड मिळणं सुद्धा कसं कठीण झालं होतं हे सुद्धा सत्यजीतनं त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
अभिनेता सत्यजीत दुबेनं काही दिवसांपूर्वी त्याच्या आईला कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचं सांगितलं होतं. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यानं सांगितलं होतं की त्यांच्या आईला मायग्रेनची समस्या आहे आणि जवळपास एका आठवड्यापूर्वी तिला ताप आला होता. याशिवाय थंडी लागणे, उलटी होणे, अंग दुखणे यासारख्या समस्या सुरू झाल्यावर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. टेस्ट केल्यावर ती कोरोना पॉझिटिव्ह आली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार त्यावेळी सत्यजीतच्या आईला बेड मिळत नव्हता. ज्यानंतर सत्यजीतला आपण अभिनेता असल्याचं सांगावं लागलं.
VIDEO : कतरिनासाठी दबंग खाननं गायलं रोमँटिक गाणं, पाहत राहिला विकी कौशल
या वृत्तानुसार सत्यजीतनं सांगितलं, तिला या स्थितीत पूर्ण आराम मिळावा असं एक मुलगा म्हणून मला वाटत होतं. पण जेव्हा तुम्ही सामान्य व्यक्ती म्हणून या सर्व गोष्टींना सामोरं जाता तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक बेड मिळणं सुद्धा तुम्हाला कठीण जातं. देवाचे खूप आभार की, मी जे काम करतो आणि ज्यांच्यासोबत काम करतो त्या सर्वांची मला खूप मदत झाली. मी त्यावेळी काही लोकांना कॉल केला आणि त्यांनी मला मदत सुद्धा केली.
SHOCKING! 'बबीता जी'ला नेहमी मारहाण करायचा बॉयफ्रेंड, वाचा पुढे काय घडलं
सत्यजीतनं सांगितलं की, प्रस्थानम सिनेमातील त्याचे को-स्टार्स संजय दत्त, अली फजल, टिस्का चोप्रा आणि अमितोष नागपाल यांनी यावेळी त्याला खूप मदत केली. सत्यजीतच्या आईवर अद्याप उपचार सुरू आहेत. तसेच सत्यजीत आणि त्याची बहीण सुद्धा आयसोलेशनमध्ये आहे.
फ्लॉप सिनेमामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री, खलनायकी भूमिकेनं चमकलं नशीब