जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / SHOCKING! 'बबीता जी'ला नेहमी मारहाण करायचा बॉयफ्रेंड, वाचा पुढे काय घडलं

SHOCKING! 'बबीता जी'ला नेहमी मारहाण करायचा बॉयफ्रेंड, वाचा पुढे काय घडलं

SHOCKING! 'बबीता जी'ला नेहमी मारहाण करायचा बॉयफ्रेंड, वाचा पुढे काय घडलं

बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता एका बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत होती मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मे : तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय शोमधलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. या शोमध्ये अभिनेत्री मुनमुन दत्ता ‘बबीता जी’ची भूमिका साकारत आहे. या शोमधील बबीता आणि जेठालाल यांची प्रेमळ भांडणं तर सर्वांनाचं पाहायला आवडतात. पण बबीता कधी काळी रिअल लाइफमध्ये बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला डेट करत होती. मीडिया रिपोर्टनुसार हे दोघं 2008 मध्ये एकमेकांना डेट करत होते मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. लवकरच दोघांचं ब्रेकअप झालं. सूत्रांच्या माहितीनुसार मुनमुन दत्ताचं नाव बिग बॉस फेम बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीशी जोडलं गेलं होतं. पण कोहलीच्या वाईट वागणूकीमुळे त्यांचं नातं तुटलं. 2008 मध्ये मुनमुन आणि अरमान यांच्यातली जवळीक वाढली आणि त्याच वर्षाच्या अखेरीस त्यांच्या नात्यात दुरावा सुद्धा आला. असं म्हटलं जातं की व्हॅलेंटाईन डे दिवशीच काही कारणानं मुनमुन यांच्यात भांडण झालं होतं. त्यावेळी अरमाननं मुनमुनला मारहाण केली होती. मुनमुननं पोलिसात याची तक्रार सुद्धा केली होती. ज्यामुळे अरमानला दंड भरावा लागला होता.

जाहिरात

मुनमुन आणि अरमान यांच्या भांडणाची साक्षी डॉली बिंद्रा होती. तिच्या म्हणण्यानुसार मुनमुनसोबत अरमान कधीच नॉर्मल वागत नव्हता. जेव्हा ही दोघं मॉरिशस व्हेकेशनला गेले होते. त्यावेळी अरमान मुनमुनला मारहाण करत असे. तिनं अनेकदा मुनमुनला रडत रडत घरातून बाहेर पडताना पाहिलं होतं. इतकंच नाही तर डॉलीनं आपला नवरा कैजादला सांगून या दोघांमधील भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अरमाननं या दोघांनाही वाईट वागणूक दिली.

तारक मेहता का उल्टा चश्मा या शोमध्ये कृष्णन सुब्रमण्यम अय्यर आणि बबीता कृष्णन अय्यर ही जोडी लोकप्रिय आहे. बबीता गोकुळधामधली सर्वात सुंदर आणि मॉडर्न स्त्री आहे. शोमध्ये जेठालाल नेहमीच बबीता जी सोबत फ्लर्ट करताना दिसत असतो. त्यांच्या दोघांची ही केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या भूमिकेनं मुनमुनला स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात