जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: पंचरत्नांना आठवलं 'बचपन का प्यार'; पाहा कशी धमाल केली 'लिटिल चॅम्पस'च्या परीक्षकांनी

VIDEO: पंचरत्नांना आठवलं 'बचपन का प्यार'; पाहा कशी धमाल केली 'लिटिल चॅम्पस'च्या परीक्षकांनी

VIDEO: पंचरत्नांना आठवलं 'बचपन का प्यार'; पाहा कशी धमाल केली 'लिटिल चॅम्पस'च्या परीक्षकांनी

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa little champs) या कार्यक्रमातील जज म्हणजेच पंचरत्न या viral गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 1 ऑगस्ट : सध्याच्या डिजिटल युगात कधी कोणता ट्रेंड सुरू होईल सांगता येत नाही. एका गाण्याने सध्या चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. एका लहान मुलाच्या आवाजातील हे गाणं प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. सामान्य प्रेक्षकांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही त्याची भुरळ पडताना दिसतेय. ‘बचपन का प्यार मेरा’ (Bachpan ka pyar mera) हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. झी मराठीवरील (Zee Marathi) ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa little champs) या कार्यक्रमातील जज म्हणजेच पंचरत्न या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. कार्यक्रमात असलेले हे परीक्षक खऱ्या आयुष्यात तितकेच खोडकर आणि मौज करणारे आहेत. अनेकदा कार्यक्रमाच्या मागच्या सेटवरील गमतीशीर किस्से शेअर होत असतात. त्यातीलच एक म्हणजे कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन यांनी या व्हायरल गाण्यावर मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. (Bachpan ka pyar mera Viral song)

फक्त Mimi आणि शमाच नाही तर क्रिती-सई देखील आहेत घट्ट मैत्रिणी; फोटो शेअर करत Saie म्हणाली..
जाहिरात

पंचरत्नांचा हा व्हिडिओ प्रेक्षकांना फारच आवडत आहे. अनेकांनी यावर कमेंट्स दिल्या आहेत. दरम्यान या व्हिडिओत गायक रोहित राऊत नव्हता. व्हिडिओ पोस्ट करताना त्याला मिस केल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या कार्यक्रमात मैत्री विशेष भाग सुरू आहे. पहिल्या पर्वातील अनेक स्पर्धकांनी शो मध्ये हजेरी लावली होती. लग्नात रितेश पत्नीच्या चक्क 8 वेळा पडला होता पाया; जेनेलियानेच केली पतीची अशी पोलखोल सध्या कार्यक्रमात अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. लहान स्पर्धक अगदी हुशारीने गात आहेत. तर परिक्षकही त्यांना भरघोस मार्क्स देत आहेत. पुढच्या आठवड्यात एक वेगळी थीम पाहायला मिळणार आहे. ज्यात जुन्या आठवणी ताज्या केल्या जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात