मुंबई 1 ऑगस्ट : सध्या फ्रेंडशिप डेचा (Friendship day) सीझन सुरू आहे. प्रत्येक जण आपल्या प्रिय मित्राला आणि मैत्रिणीला शुभेच्छा देताना दिसत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणीतरी सखा किंवा सखी असते जो खूप खास असतो. यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेकांनी आपल्या प्रिय मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देताना दिसत आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकरनेही (Sai Tamhankar) तिच्या मैत्रिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) तिचे पाय रोवताना दिसत आहे. नुकताच तिचा ‘मिमी’ (Mimi) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सोबत तिने चित्रपटात काम केलं होतं. सध्या चित्रपट प्रेक्षकांची चांगली वाहवा मिळवताना दिसत आहे. त्यात तिने शमा हे पात्र साकारल आहे. ज्यात मिमी म्हणजेच क्रिती आणि सई या मैत्रिणी असतात. सईने क्रितीसोबत फोटो शेअर करत तिला मैत्री दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
HBD: ‘लिहून देते, कोणत्याही अभिनेत्याला डेट करणार नाही’ तापसीने घेतला हा निर्णय, पाहा काय होतं कारणशुभेच्छा देत सईने असही म्हटलं आहे की ‘तुमच्या आयुष्यातील शमा कोण आहे?’ या पोस्ट वर क्रितीने देखील कमेंट केली आहे. तिने प्रेमळ ईमोजी लिहिले आहे. सध्या या चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. मराठी चित्रपट मला आई व्हायचंयचा हा हिंदी रिमेक आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
ट्रोलर्सनी लिसाच्या मुलांनाही नाही सोडलं; अभिनेत्रीने सणसणीत उत्तर देत केली बोलती बंदचित्रपटात सई आणि क्रिती व्यतिरिक्त अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका होती. सई सध्या यामुळे फारच चर्चेत आहे. याशिवाय ती लवकरच एका तमिळ वेब सीरिज मध्येही दिसणार आहे. साउथ स्टार विजय सेतूपती (Viajay Setupathi) सोबत ती झळकणार आहे. तर मणिरत्नम ही सीरिज दिग्दर्शित करणार आहेत.