• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • लग्नात रितेश पत्नीच्या चक्क 8 वेळा पडला होता पाया; जेनेलियानेच केली पतीची अशी पोलखोल

लग्नात रितेश पत्नीच्या चक्क 8 वेळा पडला होता पाया; जेनेलियानेच केली पतीची अशी पोलखोल

रितेश आणि जेनेलिया ‘सुपर डान्सर्स चॅप्टर 4’ (Super Dancers chapter 4) मध्ये उपस्थित होते. त्यावेळी जेनेलियाने रितेशची पोलखोल केली.

 • Share this:
  मुंबई 1 ऑगस्ट : बॉलिवूडचं (Bollywood) पॉवर कपल (Power couple) म्हणून ओळखले जाणारे रितेश देशमुख (Riteish Deshmukh)  आणि जेनिलिया डिसोजा देशमुख (Genelia D’souza Deshmukh) सतत चर्चेत असतात. आताही त्यांनी त्यांच्या नात्याचा आणखी उलगडा करत काही किस्से सांगितले आहेत. दरम्यान या आठवड्यात रितेश आणि जेनेलिया ‘सुपर डान्सर्स चॅप्टर 4’ (Super Dancers chapter 4)  मध्ये उपस्थित होते. त्यावेळी जेनेलियाने रितेशची पोलखोल केली. जेनेलिया आणि रितेश कार्यक्रमात गेस्ट म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक गप्पा मारल्या. ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ चा हा ‘शादी स्पेशल’ एपिसोड होता. त्यात त्यांनी आपल्या लग्नातील काही किस्से सांगितलं होते. तर रितेश लग्नात तिच्या 8 वेळा पाया पडला होता. जेनेलिया म्हणाली, “आज काल आपण नव्या पद्धतीने लग्न करतो तरी मला पारंपरिक लग्न सोहळे आवडतात. मला खूप आनंदी आहे की माझं लग्नही पारंपरिक पद्धतीने झालं. मी लग्न सोहळ्यात खूप रडले आणि हसले. एवढंच नाही तर रितेश माझ्या पाया पडला होता.”
  पुढे ती म्हणाली “रितेश 8 वेळा माझ्या पाया पडला होता, 8 वेळा.” त्यानंतर रितेशनेही यावर हसत हसत उत्तर दिलं, तो म्हणाला “मला असं वाटतं की जे ब्राह्मण होते त्यांना माहीत होतं की मला लग्नानंतर काय करायचं आहे, त्यामुळे त्यांनी माझ्याकडून आधीच तयारी करून घेतली होती.” यानंतर सगळेच जन हसू लगाले.

  फक्त Mimi आणि शमाच नाही तर क्रिती-सई देखील आहेत घट्ट मैत्रिणी; फोटो शेअर करत Saie म्हणाली..

  अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) देखील या शोची जज होती. मात्र राज कुंद्रा (Raj Kundra) प्रकरणानंतर ती शोमध्ये गैरहजर आहे. दरम्यान रितेश आणि जेनेलियाने एका आठवड्यासाठी हजेरी लावली होती. तसेच शिल्पा शोमध्ये कधी परतणार यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
  Published by:News Digital
  First published: