23 वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, राहत्या घरात फॅनला लटकलेला आढळला मृतदेह

23 वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, राहत्या घरात फॅनला लटकलेला आढळला मृतदेह

बंगाली अभिनेत्रीने मानसिक तणावात येऊन आत्महत्या केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. कोलकतामधील तिच्या राहत्या घरात तिचा मृतदेह आढळला आहे.

  • Share this:

कोलकाता, 12 फेब्रुवारी : बंगाली अभिनेत्री सुबर्णा जॅश हिने आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी, 9 फेब्रुवारीला राहत्या घरात तिचा मृतदेह सापडला आहे. 23 वर्षीय सुबर्णा जॅश मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती मिळते आहे. तिच्या आई-वडिलांना तिचा मृतदेह घरातील फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसला. लगेचच तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केलं.

सुबर्णा जॅश हिने काही बंगाली मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘मयुरपंख’ ही तिची शेवटची मालिका होती. तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुबर्णा ही गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती.

सुबर्णाचा जन्म पश्चिम बंगालमधील बर्धमान ( BURDWAN) जिल्ह्यात झाला. त्यानंतर ती शिक्षणासाठी कोलकात्याला आली. शिक्षण सुरू असलं तरी अभिनेत्री होण्याचं स्वप्न सुबर्णाला झोपू देत नव्हतं. त्यामुळे तिने कोलकात्यामध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तिने ऑडिशन्सला जाण्यास सुरुवात केली आणि तिला सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम मिळण्यास सुरुवात झाली. मात्र दुर्दैवाने तिला कोणतीही मोठी भूमिका मिळू शकली नाही.

बॉलिवूडमध्ये नक्की काय चाललंय? गणेश आचार्यनंतर आता अभिनेत्यावर गुन्हा दाखल

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, यातूनच ती तिला नैराश्य आलं. गेले काही दिवस ती नैराश्यात होती.

टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी हिंदी मालिकांमधील अभिनेत्री सेजल शर्माचानेही मुंबईतल्या मिरारोड येथिल तिच्या भाड्याच्या घरात आत्महत्या केली होती.

अवधूत गुप्तेनं असं काय लिहिलं की जे Tweet त्याला डिलिट करावं लागलं...

First published: February 13, 2020, 7:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading