मुंबई, 12 फेब्रुवारी : नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरु आहे. काही दिवसांपूर्वी तर हे दोघंही येत्या 14 फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं मात्र आदित्यचे वडील उदित नारायण यांनी मात्र या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. या सर्वांतच आता नेहा आणि आदित्यचं गोवा बीच हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. ज्यात नेहा आणि आदित्यची रोमँटिंक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
गोवा बीच हे नेहा-आदित्यचं गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. हे गाणं टोनी कक्कर आणि नेहानं गायलं आहे. तसेच या गाण्याच्या लिरिक्स सुद्धा टोनी कक्करच्या आहेत. तर आदित्यचं हे पहिलंच व्हिडीओ साँग आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये नेहा आणि तिची मैत्रिण ‘लुटेरी’ असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ज्या मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लुटतात. आतापर्यंत हे गाणं 4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. या गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
Angrezi Medium Trailer रिलीजआधी इरफान खान झाला भावुक, पाहा VIDEO
याआधी नेहा कक्कर तिच्या सोशलम मीडियावरील काही फोटोंमुळे चर्चेत आली होती. नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिनं तिचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिचे हे फोटो सध्या सगळीकडे खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील खास गोष्ट अशी की नेहाचे हे सर्व फोटो विनामेकअप आहेत. नेहानं तिच्या सोशल मीडियावर नो मेकअप लुकमधील एक दोन नाही तर चक्क तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं, ‘नो फिल्टर’
'दिल्लीकरांनी जनतेच्या मनातली गोष्ट सांगितली', अवधुत गुप्तेची भाजपला कोपरखळी
नेहाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या कमेंट येत आहेत. अनेकांनी नेहाचं कौतुक केलं आहे. कारण कॅमेरासमोर नेहमीच मेकअपमध्ये वावरणाऱ्या अभिनेत्री किंवा गायिका शक्यतो मेकअपशिवाय कॅमेरासमोर येणं टाळतात. नेहा आणि आदित्यच्या लग्नाला आता अवघे 3 दिवस बाकी असताना आदित्यचे वडील उदित नारायण यांनी नेहा त्यांच्या घरची सून होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याच बरोबर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं देखील स्पष्ट केलं.
बॉलिवूडमध्ये नक्की काय चाललंय? गणेश आचार्यनंतर आता अभिनेत्यावर गुन्हा दाखल
बॉलिवूड हंगामा या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण यांनी सांगितलं, नेहा कक्कर आणि आदित्य यांच्या लग्नाच्या चर्चा फक्त अफवा आहेत. हे केवळ इंडियन आयडॉल शोचा टीआरपी वाढवण्यासाठी करण्यात आलं होतं. कारण या शोमध्ये नेहा जज तर आदित्य होस्ट आहे. आदित्य माझा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची मी आतुरतेनं वाट पाहत आहे. जर नेहासोबत त्याच्या लग्नाच्या चर्चा जर खऱ्या असत्या तर मला नक्की आनंद झाला असता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.