कोणीतरी आवरा हिला! सारा अली खानचे काळ्या-निळ्या लिपस्टिकमधील PHOTO VIRAL

कोणीतरी आवरा हिला! सारा अली खानचे काळ्या-निळ्या लिपस्टिकमधील PHOTO VIRAL

साराचा हा अवतार पाहिल्यावर एक मिनिटासाठी कोणीतरी आवरा हिला असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : अभिनेत्री सारा अली खान नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. पदार्पणातच दोन्ही सिनेमा सुपरहीट देणारी सारा मागच्या काही काळापासून तिचा आगामी सिनेमा ‘कुली नंबर 1’च्या शूटिंगमध्ये बीझी होती. मात्र आता या सिनेमाचं शूटिंग संपलं असून सारा अली खान न्यूयॉर्क सिटीमध्ये तिची सुट्टी एंजॉय करत आहे. सारानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती न्यूयॉर्कमध्ये धम्माल करताना दिसत आहे. पण यातील साराचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सारा अली खान सुट्टी एंजॉय करतानाच तिच्या चाहत्यांना फॅशन टीप्स देताना दिसत आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्राम नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं गडद काळ्या-निळ्या रंगाची लिपस्टिक लावलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सारानं लिहिलं, ‘अशी गडद लिपस्टिक लावणं न्यूयॉर्क सिटीमध्ये खूपच सामान्य बाब आहे.’ साराच्या या फोटोवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. पण विशेष म्हणजे साराच्या अवतारावरुन तिला कोणीही ट्रोल मात्र केलेलं दिसत नाही. पण एक मिनिटासाठी कोणीतरी आवरा हिला असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

'तारक मेहता...' आणखी एक धक्का, आता 'या' अभिनेत्रीनं सोडला शो

बॉलिवूडमध्ये अत्रंगी फॅशन खरंतर नवी गोष्ट नाही. याआधी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिनं कान्स फेस्टिव्हलमध्ये पर्पल कलरची लिपस्टिक लावल्यानं चर्चेत आली होती. तर प्रियांका चोप्राचा मेट गाला लुक सुद्धा चर्चेचा विषय ठरला होता. तर दुसरीकडे अभिनेता रणवीर सिंह सुद्धा नेहमीच अशाच विचित्र फॅशनमध्ये दिसून येतो आणि यावर या सर्वांची खिल्ली सुद्धा उडवली गेली आहे. पण साराच्या बाबतीत मात्र असं काहीही झालेलं नाही.

सलमानच्या वाढदिवसाला अर्पिता खान देणार दुसऱ्या बाळाला जन्म? वाचा काय आहे सत्य

View this post on Instagram

🗽🌈 @vivo_india

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा कार्तिक आर्यनसोबतचा ‘लव्ह आज कल 2’ पुढच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांच्या लिंकअपच्या चर्चांमुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांना या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. याशिवाय वरुण धवनसोबत ती ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सारा आणि वरुण पहिल्यांदाच स्क्रीन शएअर करणार आहेत.

इंजिनियरिंग सोडून गाठलं होतं बॉलिवूड, आता अक्षय कुमारवर भारी पडतोय हा अभिनेता

=======================================================

Published by: Megha Jethe
First published: November 22, 2019, 4:40 PM IST

ताज्या बातम्या