मुंबई, 13 ऑगस्ट : अभिनेत्री सारा अली खाननं नुकताच 12 ऑगस्टला 24 वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमध्ये पदार्पणातच दोन हीट सिनेमे देणारी सारा मागच्या काही काळापासून अभिनेता कार्तिक आर्यनसोबतच्या लिंकपअमुळे चर्चेत आहे. हे दोघंही लवकरच इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल 2’ या सिनेमात दिसणर आहेत. या सिनेमाचं सर्व शूट पूर्ण झालं असून त्यानंतर सारानं तिचा आगामी सिनेमा ‘कुली नंबर 1’च्या शूटिंगलाही नुकतीच सुरुवात केली आहे. सध्या या सिनेमाच्या शूटसाठी थायलंडमध्ये असून काल तिनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या एक मंदिराला भेट दिली. मात्र साराच्या वाढदिवसा दिवशीच ईद सुद्धा होती. त्यामुळे ईदच्या दिवशी सारानं मंदिरात जाणं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सारानं वाढदिवसानिमित्त तिची आई अमृता सिंगसोबत थायलंडमधील ब्रह्मा मंदिराला भेट दिली. यावेळचा एक फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं या मंदिराच्या नावाचा उल्लेख केला आहे. तसेच नंबर वन मॉम असा हॅशटॅगही वापरला आहे. साराचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
‘तारक मेहता…’मध्ये पुन्हा एकदा होणार दयाबेनची एंट्री, जेठालालनं केला खुलासा
याशिवाय अभिनेता कार्तिक आर्यन सुद्धा साराला भेटायला थायलंडला पोहोचला होता. त्यानं सारा सोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला कार्तिकनं हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस आणि ईद मुबारक (यावेळी मास्क न लावता) असं कॅप्शन दिलं आहे. या अगोदरही कार्तिक आणि सारानं ईदच्या वेळी एक फोटो शेअर केला होता मात्र त्यावेळी त्यांनी आपला चेहरा झाकला होता.
शारीरिक शोषण, अश्लील कमेंट, बोल्ड फोटो… आईच्या तक्रारीनंतर पलकनं सांगितलं सत्य
या वर्षी साराचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून दिसत आहे. ‘कुली नंबर 1’ च्या सेटवरही साराचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिला तो कार्तिक आर्यननं शेअर केलेला सारासोबतचा फोटो. या फोटोद्वारे कार्तिकनं त्यांचं नातं ऑफिशिअल केल्याचंही बोललं जात आहे. सारा आणि कार्तिकचा ‘लव्ह आज कल 2’ हा सिनेमा 2020ला व्हेलेंटाइन डेच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. याशिवाय साराकडे सध्या ‘कुली नंबर 1’ हा रिमेक असून यामध्ये ती अभिनेता वरुण धवन सोबत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन वरुण वडील डेव्हिड धवन करत आहेत. …म्हणून श्रीदेवीनं अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करण्यास अचानक दिला होता नकार ======================================================================== SPECIAL REPORT : बोगस बॉलिवूड, मुंबईतून पैसा हवा पण महापुराला मदत नको?

)







