मुंबई, 13 ऑगस्ट : छोट्या पडद्याची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) वर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अभिनवला अटक केली. श्वेताने तक्रारीत अभिनव तिच्या मुलीला पलकला मारहाण करायचा असं नमूद केलं.श्वेतासोबत पलकही पोलीस ठाण्याच्या बाहेर रडताना दिसली. स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अभिनव पत्नी श्वेता आणि पलकसोबत वाईट वागायचा. जेव्हा अभिनवने कोणताही विचार न करता मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा श्वेताने हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याचं ठरवलं.
मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली असून सध्या पोलिसांनी अभिनवला अटक केली असून. कौटुंबिक हिंसाचारामुळे श्वेताला दुसऱ्यांदा पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनव, पलकवर अश्लील कमेंट करायचा. श्वेताने आपल्या तक्रारीत म्हटलं की, 2017 मध्ये अभिनवने पलकला त्याच्या मोबाइलमध्ये एका मॉडेलचा अश्लिल फोटो दाखवला होता. श्वेताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार तास अभिनवची चौकशी केली.
जाणून घ्या Netflixवर रीलिज होण्याआधी कसा पाहता येईल Sacred Games 2
त्यानंतर आता श्वेताची मुलगी पलक तिवारी हिनं या प्रकरणावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत या प्रकरणाविषयीची आपली प्रतिक्रिया दिली आहे. पलक म्हणाली, ‘सर्वात आधी मी त्या सर्वांचे आभार मानते ज्यांनी काळजी दाखवली आणि आम्हाला मदत केली. पण आता मी मला माझ्या बाजूनं काही गोष्टींचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. मीडियाकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आणि असणारही नाही. मी पलक तिवारी अनेकदा घरगुती हिंसाचाराची शिकार झाले आहे. मात्र माझ्या आईसोबत असं काहीही घडलेलं नाही. त्यांनी तक्रार दाखल करण्याच्या दिवसापर्यंत आईवर कधीच हात उचलला नव्हता. वाचक म्हणून ते जाणून घेणं कठीण आहे की बंद दरवाजामागे काय चाललं आहे. माझ्या आईनं तिच्या दोन्ही लग्नांच्या वेळी किती धाडस केलं आहे हे कोणालाच माहीत नाही आणि कोणीही अशा परिस्थितीचा सामना केला नसेल त्यामुळे कोणालाही आमच्या या परिस्थितीवर कमेंट करण्याचा काहीही अधिकार नाही.'
रणबीर कपूरने महेश भट्टांकडे मागितला आलियाचा हात, डोळ्यात होतं पाणी!
पलक पुढे लिहिते, 'अभिनव कोहलीनं मला कधीच चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केलेला नाही. किंवा माझं शारीरिक शोषण केलेलं नाही. अशा प्रकारच्या बातम्या पसरवण्याआधी आपण सत्य काय आहे हे समजून घेणं गरजेच आहे. त्यानं अनेकदा माझ्यावर अश्वील कमेंट केल्या आहेत. अशा की ज्या एखादी मुलगी किंवा महिला ऐकू शकत नाही. अशा प्रकारच्या कमेंटची अपेक्षा तुम्ही तुमच्या वडीलांकडून करत नाहीत. सर्वजण सोशल मीडियावरून आमच्या आयुष्याबाब जाणण्याचा प्रयत्न करतात. पण आमच्या खाजगी जीवनावर कमेंट करण्याएवढं कोणालाही काही माहिती नाही.'
हिमांश कोहलीनंतर आता या स्पर्धकाला डेट करतेय नेहा कक्कर?
श्वेताचा पहिला पती राजा चौधरीनंही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजानं म्हटलं, 'हे सर्व ऐकल्यावर मलाही धक्का बसला. वडील म्हणून हे सर्व ऐकण माझ्यासाठी खूपच कठीण होतं. मला मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती मिळाली. मी माझ्या मुलीशी बोललो असून तिनं सांगितलं की काळजी करण्याची काही गरज नाही मी ठीक आहे. पण एक वडील म्हणून माझ्यासाठी हे सर्व खूप त्रासदायक होतं.'
======================================================
SPECIAL REPORT : बोगस बॉलिवूड, मुंबईतून पैसा हवा पण महापुराला मदत नको?