Home /News /entertainment /

96 किलोची सारा अली खानं कशी झाली Fit and fine? पाहा हा व्हिडीओ

96 किलोची सारा अली खानं कशी झाली Fit and fine? पाहा हा व्हिडीओ

सारानं आपलं 96 किलो वजनाचं शरीर कमी केलं. (Sara Ali Khan exercise video) अन् हे वजन कमी करण्यासाठी केलेले व्यायाम आता ती आपल्या चाहत्यांसोबत देखील शेअर करताना दिसत आहे.

  मुंबई 3 जुलै: सारा अली खान (Sara Ali Khan) आज बॉलिवूडमधील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील तिच्या मादक शरीराची तोंड भरून स्तुती करतात. परंतु एका काळ असाही होता जेव्हा साराला तिच्या वजनदार शरीरामुळं ट्रोल केलं जायचं. (Sara Ali Khan movies) लोक तिची खिल्ली उडवायचे त्यामुळे ती काही वर्ष नैराश्येत देखील होती. परंतु योग्य आहार आणि तंत्रशुद्ध व्यायाम करुन सारानं आपलं 96 किलो वजनाचं शरीर कमी केलं. (Sara Ali Khan exercise video) अन् हे वजन कमी करण्यासाठी केलेले व्यायाम आता ती आपल्या चाहत्यांसोबत देखील शेअर करताना दिसत आहे. 'निगेटिव्ह पब्लिसिटी नको असेल तर 25 लाख द्या'; KRK चा तो ऑडियो झाला लीक सारानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने विविध प्रकारचे व्यायाम दाखवले आहेत. यातील अनेक प्रकार तुम्ही घरच्या घरी देखील करु शकता. हे व्यायाम करुन तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात येईल असा विश्वास सारा अली खाननं व्यक्त केला आहे. यापूर्वी देखील तिने अनेक वेळा मुलाखतींद्वारे वजन कमी करण्याचे विविध उपाय आपल्या चाहत्यांना सांगितले आहेत. दरम्यान तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओसाठी तिचे आभार मानले आहेत. फ्लॉप डिनो मोरिया कसा झाला करोडपती? 9 वर्ष का होता बॉलिवूडपासून दूर?
  सारा आता जरी अत्यंत सुंदर आणि फिट दिसत असली तरी बॉलिवूड पदार्पणापूर्वी तिला अनेकदा स्थूलपणामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. कारण साराचं वजन 96 किलो इतकं होतं. अभिनयाचं वेड तिला लहानपणापासूनच होतं. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात तिने स्थूलपणावर काम करण्याच निर्धार केला. व्यायाम, डाएट असं सर्व गोष्टी करत तिने वजन घटवलं आणि 2018 मध्ये तिला पहिला ब्रेक मिळाला.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Bollywood, Health Tips, Sara ali khan, Viral videos

  पुढील बातम्या