मुंबई 3 जुलै: नेहमीच चर्चेत आणि वादविवादात असलेला अभिनेता तसेच स्वघोषित चित्रपट समीक्षक केआरके (KRK) अर्थात कमाल राशिद खान (Kamal Rashid Khan) पुन्हा एकदा एका विवादात सापडला आहे. KRK इंडस्ट्रीतील लोकांना ब्लॅकमेल करत असल्याचं यातून समोर येत आहे. (Krk blackmails producers) गेल्या काही दिवसांपासून KRK सतत चर्चेत आहे. निरनिराळ्या कारणांसाठी तो चर्चेत आहे. सलमान खान (Salman Khan), मीका सिंग (Mika Singh), अक्षय कुमार (Akshay Kumar), रणबीर कपूर (Ranbir Kapur), विद्या बालन (Vidya Balan) या सगळ्यांसोबत KRK ने मागील काही दिवसांत पंगा घेतला आहे. पण आता KRK विरोधात एका निर्मात्याने एक पुरावाच सादर केला आहे. रोहित चौधरी नामक एका निर्मात्याने KRK इंडस्ट्रीतील लोकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत असल्याचं म्हटलं आहे. तर तसा पुरावा ही सादर केला.
HBD: पती हर्ष मुळेच जावं लागलं होतं शो बाहेर; कॉमेडी क्वीन भारती सिंगची अशी होती लवस्टोरीया निर्मात्याने ट्विटर वर पोस्ट करत म्हटलं आहे की, KRK निगेटिव्ह पब्लिसिटी न करण्यासाठी 25 लाखांची मागणी करतो. त्याने ट्विट करत लिहिलं आहे, ‘नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक ऑडियो क्लिप सादर करत मोठा खुलासा करणार आहे. इथे मी एका खूप मोठ्या ब्लॅक मेलरविषयी बोलत आहे. नेगेटिव्ह पब्लिसिटी न करण्यासाठी पैसे घेतो.’
Hello Friends, today I am sharing an audio recording as a revelation in front of you. In which I am talking to the biggest blackmailer of the Indian film industry who asks for money for not doing negative publicity of the film. #KRKBlackMailer #KRKKutta #RohitChoudhary pic.twitter.com/lzJIpTabTc
— ROHIT CHOUDHARY (BHAWAN SINGH) (@1rohitchoudhary) July 2, 2021
त्याने सादर केलेल्या ऑडिओत KRK म्हणत आहे की, “25 लाखच माझा रेट आहे. हेच आमचं काम आहे. आमच्याकडे पण स्टाफ आहे ज्यांना आम्हाला पगार द्यायचा असतो.” पण यानंतर अनेकजण #krkblackmailer असा hashtag ही वापरत आहेत. दरम्यान हा ऑडियो krk चाच आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

)







