मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

फ्लॉप डिनो मोरिया कसा झाला करोडपती? 9 वर्ष का होता बॉलिवूडपासून दूर?

फ्लॉप डिनो मोरिया कसा झाला करोडपती? 9 वर्ष का होता बॉलिवूडपासून दूर?

यामी गौतमनंतर बॉलिवूडचा आणखी एक धक्का; डिनो मोरिया अडकला EDच्या जाळ्यात

यामी गौतमनंतर बॉलिवूडचा आणखी एक धक्का; डिनो मोरिया अडकला EDच्या जाळ्यात

यामी गौतमनंतर बॉलिवूडचा आणखी एक धक्का; डिनो मोरिया अडकला EDच्या जाळ्यात

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 3 जुलै: ‘राज’ (Raaz) या भयपटातून नावारुपास आलेला डिनो मोरिया (Dino Morea) एकेकाळी बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जायचा. राजमध्ये त्याने केलेले इन्टिमेट सीन्स पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. परंतु त्यामुळेच त्याला अफाट लोकप्रियता देखील मिळाली होती. मात्र त्यानंतर ‘अक्सर’ हा एकमेव चित्रपट वगळता डिनोला म्हणावं तसं यश मिळालं नाही. (Dino Morea Movie) परिणामी एकामागून एक मिळणाऱ्या फ्लॉप चित्रपटांमुळं त्याने अखेर बॉलिवूडपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. गेली 9 वर्ष तो अज्ञातवासात होता. अन् आज अचानक सक्तवसुली संचलनालयाची धाड पडल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला. (Dino Morea how to become millionaire) परंतु यामुळे अनेकांना प्रश्न असा पडतोय की हातात कुठलेही चित्रपट नसतानाही डिनोने कोट्यवधी रुपये जमा केले तरी कसे? तर मग पाहूया बॉलिवूडपासून दूर राहिलेला डिनो नेमकं काय करत होता?

हासिलला का मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार? तिग्मांशू धुलियानं सांगितलं धक्कादायक कारण

डिनो मोरिया यानं हॉटेल मॅनेजमेंट आणि मार्केटिंगमध्ये एमबीए केलं आहे. त्यानं मॉडलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. याच दरम्यान त्याच्या बॉलिवूड करिअरची देखील सुरुवात झाली. परंतु बॉलिवूडमध्ये काम करत असतानाच त्यानं आपला अभ्यासही सुरु ठेवला होता. याचा फायदा त्याला इतरत्र गुंतवणूक करण्यासाठी झाला.

भारती सिंग सोशल मीडियावरही हिट; फोटो पोस्ट करून कमावते कोट्यवधी रुपये

चित्रपटांमधून मिळालेल्या पैशांना त्यानं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गुंतवण्यास सुरूवात केली. त्याने गोवा आणि केरळमध्ये काही रिसॉर्ट देखील सुरु केले. मग या व्यवसायातून मिळणारे पैसे रिअल इस्टेट आणि इतरत्र व्यवसायात तो गुंतवत होता. या सर्व आर्थिक उलाढाली होत असताना त्याचा मॉडलिंग करिअर देखील सुरु होतं. फॉक्स लाईफला दिलेल्या मुलाखतीत त्यानं ही माहिती दिली होती. बॉलिवूडमधून काम मिळत नसलं तरी देखील एखाद्या सुपरस्टार सेलिब्रिटीप्रमाणे तो आपलं आयुष्य व्यतीत करत होता. मात्र या गुंतवणूकीत त्यानं आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती आता ED च्या हाती लागली. परिणामी सध्या त्याची चौकशी सुरु आहे.

First published:

Tags: Bollywood actor, ED, Entertainment