मुंबई, 14 जुलै: अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. दररोज तो अनेक गोष्टी शेअर करत असतो. नुकतीच त्यानं त्याची फिल्म स्कूल देखील सुरू केली. दरम्यान संतोष जुवेकरबरोबर एक धक्कादायक प्रसंग घडला. या प्रसंगाचा व्हिडीओ संतोषनं शेअर केला आहे. घडलेला संपूर्ण प्रकार संतोष त्यात सांगितला असून त्यानं याबाबत माफी देखील मागितली आहे. संतोषचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. असं काय झालंय संतोषबरोबर जाणून घेऊया. अभिनेता संतोष जुवेकर ठाण्यात राहतो. तो राहतो त्या सोसायटीमध्ये अनेक जुनी मोठी झाडं आहेत. त्याच्या इमारतीच्या बाहेर असलेलं एक झाड दोन दिवसांच्या पावसामुळे उन्मळून पडलं. संतोषला ते कळताच त्यानं ते झाड वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. वृक्ष संवर्धन करणाऱ्या अनेकांना त्यानं फोन करुन मदतीसाठी बोलावलं. कोसळलेलं झाडाची बराच वेळ राखण केल्यानंतर काही वेळासाठी संतोष तिथून दूर गेला मात्र तो परत आला तेव्हा त्या भल्या मोठ्या, बहरलेल्या झाडाचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. हा प्रसंग त्याच्यासाठी फारच धक्कादायक होता,असं त्यानं म्हटलं आहे. हेही वाचा - Timepass 3: दीपू vsस्वीटू; टेलिव्हिजनच्या दोन प्रसिद्ध नायिका आमने-सामने
संतोषनं जेव्हा हा संपूर्ण प्रकार पाहिला तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. असं करणाऱ्यांवर त्यानं संतापही व्यक्त केला. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडीओ शेअर करत संतोषनं सगळा प्रकार सांगितला. त्यानं म्हटलंय, ‘ते झाड छान बहरलेलं होतं. त्याला पुन्हा उभं केलं तर ते बहरेल, जगेल म्हणून मी काही प्रयत्न केले. मी विजू मानेला फोन केला. रोहित जोशी म्हणून मित्राचा नंबर दिला. तो वृक्षसंवर्धनाचं काम करतो. मी बराच वेळ त्या झाडाजवळ त्याची राखण करत उभा होतो. 15-20 मिनिटं मी इथून दुसरीकडे गेले आणि या वेळात त्या सुंदर झाडाचे तुकडे करण्यात आले. या गोष्टीचं मला फार वाईट वाटतंय. माझ्या चुकीमुळे हे झाड कापलं गेलं. मी माफी मागतो मी वाचवू शकलो नाही’. ‘असं होऊ देऊ नका. तुमच्या घराबाहेर असं झाड उन्मळून पडलं असेल, छान बहरलं असेल. ते झाड जिवंत राहू शकतं अशी खात्री तुम्हाला असेल तर तर ते झाड वाचवा’, असं आवाहन संतोषनं या निमित्तानं केलं आहे. मोठ्या झालेल्या झाडांमध्ये जी ताकद असते तितकी ताकद लहान झाडांमध्ये नसते. त्यामुळे झाड वाचवण्याचा प्रयत्न करा, असंही संतोष म्हणाला. संतोष जुवेकर जे झाड वाचवण्याचा प्रयत्न करत होता ते झाड किती महत्त्वाचं होतं याविषयी माहिती त्याच्या मित्रानं दिली आहे.