मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Timepass 3: दीपू vsस्वीटू; टेलिव्हिजनच्या दोन प्रसिद्ध नायिका आमने-सामने

Timepass 3: दीपू vsस्वीटू; टेलिव्हिजनच्या दोन प्रसिद्ध नायिका आमने-सामने

टाइमपास 3 हा सिनेमा येत्या 29 जुलैला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात टेलिव्हिजनच्या दोन नायिका आमने सामने येणार आहे. स्वीटू आणि दीपू पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

टाइमपास 3 हा सिनेमा येत्या 29 जुलैला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात टेलिव्हिजनच्या दोन नायिका आमने सामने येणार आहे. स्वीटू आणि दीपू पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

टाइमपास 3 हा सिनेमा येत्या 29 जुलैला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात टेलिव्हिजनच्या दोन नायिका आमने सामने येणार आहे. स्वीटू आणि दीपू पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 14 जुलै: प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करण्यासाठी 'टाईमपास 3' हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'टाइमपास' आणि 'टाइमपास 2' मध्ये दिसलेले धम्माल कलाकार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पहिल्या दोन सिनेमातील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या डोक्यात फिट झाली आहेत. तसंच हृताही 'पालवी' बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल यात काही शंका नाही. हृताबरोबर या सिनेमात सगळ्यांची लाडकी स्वीटू देखील दिसणार आहे. (timepass 3 deepu vs sweetu)  आता तुम्ही म्हणल स्वीटू यात कशी?, तर स्वीटू म्हणजे अभिनेत्री अन्विता फलटकरही या सिनेमाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. यानिमित्तानं टेलिव्हिजनवरच्या दोन नायिका मोठ्या पडद्यावर एकत्र झळकताना दिसणार आहे.

स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकरनं टाइमपास सिनेमात प्राजूची मैत्रीण चंदाची भूमिका साकारली होती. प्राजूची मैत्रीण चंदा हे पात्र अन्वितानं फार उत्तमरित्या साकारलं होतं. शॉर्ट फ्रॉक आणि डोळ्याला मोठा भिंगाचा चश्मा लावलेली चंदा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. चंदामुळेच प्राजू आणि दगडूची लागलेली वाटही प्रेक्षकांना चांगलीच आठवत असेल. टाइमपास 2 मध्ये अन्विताला प्रेक्षकांनी मिस केलं.

View this post on Instagram

A post shared by (@marathiserials_official)

हेही वाचा - Man Udu Udu Jhala: मालिका बंद होणार कळताच भारावले प्रेक्षक; होतेय मालिका बंद न करण्याची मागणी

चंदा हे पात्र टाइमपासच्या तिनही सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. टाइमपास मध्ये अभिनेत्री अन्विता फलटणाकरनं चंदा साकारली होती टाइमपास 2मध्ये अभिनेत्री क्षिती जोग चंदाच्या भूमिकेत दिसली होती. आणि आता टाइमपास 3मध्ये पुन्हा एकदा अन्विता फलटणकर चंदा म्हणून दिसणार आहे. बालभारती, कोंबडा, दगडू, पालवी आणि  चंदा यांची धम्माल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अन्विता आणि हृता दोघींनी झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून स्वीटू म्हणून अभिनेत्री अन्विता फलटणकरनं प्रेक्षकांची मनं जिंकली. तर 'मन मन उडू उडू झालं' मालिकेतून हृता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. टेलिव्हिजनच्या या दोन्ही नायिका प्रेक्षकांच्या आवडत्या नायिका आहेत. त्यामुळे दोघींना एकत्र सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.  आता अन्विताची सिनेमातील भूमिका कशी असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. टाइमपास 3 हा सिनेमा येत्या 29 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial